रोटरी क्लबकडून खडपोली हायस्कूलला संगणक संच

Edited by: मनोज पवार
Published on: September 16, 2025 19:14 PM
views 18  views

चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, खडपोली येथे रोटरी क्लब घोरपडी गाव, पुणे या संस्थेतर्फे तीन संगणक संच भेट म्हणून देण्यात आले. हा कार्यक्रम शनिवार, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडला. कार्यक्रमास परशुराम एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री. परागजी भावे, रोटरी क्लब पुणेचे अध्यक्ष श्री. श्यामकुमार कदम, सचिव श्री. शाम वाघमारे, खजिनदार श्री. अशोक शेट्टी, प्रा. आकाश कांबळे, श्रीमती सुजाता गवळी, सौ. निवेदिता साळवी, सौ. शैला शिंदे तसेच विद्यालयाच्या लिपिक सौ. शुभांगी शिंदे आणि मुख्याध्यापिका सौ. वीणा चव्हाण उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतगीताने झाली. पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आले. यावेळी शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. दिलीप चव्हाण, सदस्य श्री. अनंत गजमल उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ. वीणा चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून परशुराम एज्युकेशन सोसायटीचा दैदीप्यमान इतिहास उलगडला. रोटरी क्लब पुणेचे अध्यक्ष श्री. श्यामकुमार कदम यांनी शाळेला पुन्हा भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, सौ. खेतले यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर समारोप श्री. जांभळे यांनी केला. संगणक साक्षरता विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गरज असून रोटरी क्लबने दिलेली भेट मोलाची असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला.