
चिपळूण : तालुका सुवर्णकार नागरी सह. पतसंस्था मर्या. चिपळूण या ३३ वर्ष कार्यरत असलेल्या संस्थेची सन २०२५ – २६ ते २०३० – ३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी नुकतीच बिनविरोध निवडणूक पार पडली. या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले राजन गोविंद लवेकर, प्रसाद अनंत सागावकर, संदीप घन:श्याम लवेकर, राजेंद्र दत्ताराम वेस्विकर, निलेश राजाराम सागवेकर, प्रशांत सुरेश सागवेकर, सौरभ उदय मिर्लेकर, संदीप अर्जुन सागवेकर, संदेश सदानंद मिर्लेकर, सौ. निता शेखर पालकर, सौ. शिल्पा नितिन मिर्लेकर याची निवड झाली.
सदर संचालकांमधून जेष्ठ संचालक राजन गोविंद लवेकर यांची चेअरमन व प्रसाद अनंत सागवेकर यांची व्हॉईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी व अध्यासी अधिकारी म्हणून सौ. प्रियांका प्रदीप माने यांनी काम पाहिले.
राजन लवेकर व प्रसाद सागवेकर यांचे बिनविरोध निवडीमुळे त्यांचे संस्थेचे माजी अध्यक्ष माधव मिरकर, माजी उपाध्यक्ष जितेंद्र वेस्विकर, सुभाष देवरुखकर, त्याच प्रमाणे कराड अर्बन बँकेचे शाखाधिकारी संदीप जोशी, अधिकारी प्रमोद पाटील, सौ. सुप्रिया मपारा, व रविंद्र जाधव, त्याचप्रमाणे चिपळूणचे क्रीडा व सहकार क्षेत्रात काम करणारे व वैश्य नागरी सह.पतसंस्थेचे तज्ञसंसचालक नयन साडविलकर यांनी अभिनंदन केले.