
चिपळूण : राष्ट्रीय अंधकल्याण संघ (नॅब) हॉस्पिटल, चिपळूण या संस्थेच्या अध्यक्षपदी चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक श्री. निलेश भुरण यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.
अभिनंदनासाठी आलेल्या मान्यवरांमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सौ. दिशाताई दाभोळकर, चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री. नितीन (अबुशेठ) ठसाळे, खेर्डी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. दशरथशेठ दाभोळकर, खेर्डी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री. प्रसाद सागवेकर, श्री. विक्रम चव्हाण, श्री. स्वप्नील कुंभार, श्री. भाऊ भुरण, श्री. संतोष कोकरे, श्री. मंगेश पवार, श्री. वैभवजी गुरव आदींचा समावेश होता. या प्रसंगी मान्यवरांनी श्री. भुरण यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.