
चिपळूण : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांनी एक आगळी वेगळी संकल्पना राबवत रुग्णांना फळ वाटप करण्यासह चिपळूण संगमेश्वर मधील शासकीय रुग्णालयांना भेट देत रुग्णालयामधील सर्व प्रकारच्या समस्यांविषयी वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. शिवाय स्वच्छते संदर्भात स्वतः पाहणी करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सूचना केल्या सरकारी रुग्णालयाच्या समस्या आपण शासन दरबारी मांडून रुग्णांना न्याय देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पूर्वीपासून मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे शिवसेना पक्षात पूर्वी अनेक वर्ष काम केले आहे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी माझ्यासारख्या बहुजन समाजातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला रत्नागिरी जिल्ह्याचा संपर्क प्रमुख बनवल्यामुळे आता माझी जबाबदारी वाढली आहे रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना पक्ष संघटना वाढण्यासाठी मी सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे असे यावेळी बोलताना सहदेव बेटकर म्हणाले.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमिक आरोग्य केंद्र कडवई, प्राथमिक आरोग्य केंद्र संगमेश्वर, कडवई मराठी शाळा, कामथे ग्रामीण रुग्णालय,लोटे येथील परशुराम हॉस्पिटल, माखजन शाळा येथे रुग्णांना आणि विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.माखजन जिल्हा परिषद गटामधील मराठी शाळेला भेट देऊन शाळेच्या कामकाजाविषयी पाहणी करून विद्यार्थ्यांना फळ वाटप केले.काही रुग्णालयामध्ये तात्पुरती स्वरूपात सेवेत घेतलेल्या सफाई कामगार आणि अन्य कामगारांच्या समस्यांविषयी कर्मचाऱ्यांनी सहदेव बेटकर यांच्याकडे चर्चा केली.
कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नाही असे सांगण्यात आले आपण या विषयात लक्ष घालून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे बेटकर म्हणाले.माखजन शिवसेना विभाग प्रमुख अनिल मोरे,जितेंद्र लाड,नरेश राणे,डॉ.मच्छिंद्र गोवळकर,दीपक निवाते,संजय डावल, सुरज पाड्याल,यश गुरव,परेश शिंदे,शाखाप्रमुख भाई मते, करजुवे गावचे सरपंच उमेश पवार, रवींद्र घाणेकर, अनिल जाधव,प्रकाश गुरव,राजेंद्र भोसले,विलास महाडिक,सिद्धार्थ पवार आदी शिवसैनिक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.