
चिपळूण : खेड तालुक्यातील विश्वनाथ विद्यालय लवेल मध्ये शिकणार्या सार्थक चांदिवडे ने इयत्ता आठवीत झालेल्या शासकीय शालान्त शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून, शिष्यवृत्ती मिळवली आहे.
सार्थक हा विश्वनाथ विद्यालयाचा हुशार आणि गुणवंत विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल विश्वनाथ विद्यालय संस्थेचे चेअरमन डॉ. अविनाश बेडेकर आणि पदाधिकारी यांनी सार्थक चे अभिनंदन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कदम आणि शिक्षकांनीही त्याचे अभिनंदन केले.