खरवते-दहिवलीमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

Edited by: मनोज पवार
Published on: July 21, 2025 14:29 PM
views 245  views

चिपळूण : शरदचंद्र पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवली च्या,  सांगली व कोल्हापूर भागातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सांगली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या स्नेहमेळाव्यास चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम,  तासगाव -कवठे महंकाळ मतदार संघाचे आमदार रोहीत पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील , सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालीकेचे माजी  महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि सह्याद्रि क्रीडा प्रबोधनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम हे प्रमुख अतिथी उपस्थित होते. शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालया मार्फत स्थापन करण्यात आलेल्या सह्याद्रि अॅग्री अॅल्युम्नी असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व माजी विद्यार्थ्यांना संघटीत करणे, आजी व माजी विद्यार्थ्यांमध्ये मैत्रीचे ऋणानुबंध कायम ठेवणे हा उद्देश ठेवुन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास सुमारे दोनशे माजी विद्यार्थ्यी उपस्थित होते.या विद्यार्थ्यांना आमदार शेखर निकम यांनी संबोधित केले. गेल्या पंचवीस वर्षापासुन अविरत पणे चालु असलेल्या महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत विविध आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयाच्या माध्यामातून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहीती त्यांनी उपस्थितांंना दिली व भविष्यात महाविद्यालयामध्ये सुधारित असे कृषि ए-आय सेंटर स्थापन करणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार रोहीत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत, स्वर्गीय माजी गृहमंत्री आर. आर. पाटील व आमदार शेखर निकम यांच्या मधील घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंध व आठवणीना उजाळा दिला. तसेच शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय हे  अद्यावत व सुसज्ज अश्या सुविधांनी परिपूर्ण असलेले महाराष्ट्रातील नामांकित महाविद्यालय आहे, असे गौरवोद्गार काढले. 

त्यांनी यावेळी  आपल्या महाविद्यालयीन जीवनातील अनेक आठवणी सांगीतल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनीही माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन जीवनानंतर विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यशाची गाठलेली उंची पाहुन ते भावुक झाले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुमारे पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे साक्षीदार होता आले , त्यांच्या सुख दुखात सहभागी होता आले,  ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे असे ते म्हणाले. . अनिरुद्ध निकम यांनी देखील यावेळी विविध विषयांवर चर्चा केली. अनेक यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार आमदार शेखर निकम, आमदार रोहीत पाटील, प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील व अनिरुद्ध निकम यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी सांगली जिल्ह्य़ातील कृषि क्षेत्रात काम करणारे विविध मान्यवर व पालक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार डाॅ.हरिश्चंद्र भागडे, श्री.विपुल घाग, प्रा.प्रसाद साळुंके  श्री.सुनिल निकम व श्री. गोकुळ प्रिधनकर यांनी विशेष परिश्रम घेतले.