
चिपळूण : ग्रामीण संस्कृतीला उजाळा देणारी आणि शेतकऱ्यांच्या परंपरेला प्रोत्साहन देणारी भव्य दिव्य राज्यस्तरीय सामूहिक नांगरणी स्पर्धा येत्या २० जुलै २०२५ रोजी रविवारी सकाळी 9.३० वा. उद्घाटन करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन श्री. किशोर भालचंद्र घाग मित्र मंडळ वतीने नायशी ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
या स्पर्धेला राजापूरचे आमदार किरण सामंत, गुहागरचे आमदार भास्कर जाधव, चिपळूण-संगमेश्वर चे आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण,उद्योजक सचिन पाकळे, चिपळूण च्या माझी सभापती पूजा निकम, संतोष खेराडे, विक्रांत जाधव ,संतोष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची विशेषता म्हणजे पारंपरिक बैलजोड्यांच्या साहाय्याने शेतात नांगरणी करण्याच्या कौशल्याचा संगम या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून नायशी परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. ऋत्वीज घाग, नायशीचे सरपंच संदिप घाग, सुयश चव्हाण आणि कु. हर्षल सदानंद घाग, रवींद्र जाधव,संतोष कदम,जीवक जाधव, ऋग्वेद घाग आदी संयोजक विशेष परिश्रम घेत आहेत.
या नांगरणी स्पर्धा नायशी गावातील शेवखंडोंडी माळ, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे होणार आहेत. या अनोख्या उपक्रमासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.