
सावर्डे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सह्याद्री शिक्षण संस्था अविरत प्रयत्न करत असून या प्रयत्नाला या संस्थेत सेवा करणारे सर्व कर्मचारी अतिशय तळमळीने सहकार्य करत असतात आणि त्यामुळेच संस्था नावारूपाला आली आहे. चित्रकला, इंग्रजी या सारख्या विषयात या निवृत्त शिक्षकांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलेले आहेत. सेवानिवृत्त शिक्षकांची जबाबदारी आता पुढील पिढीवर आलेली असून त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार शेखरजी निकम यांनी याप्रसंगी केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पर्यवेक्षक उद्धव तोडकर सहाय्यक शिक्षक सुरेंद्र अवघडे व चतुर्थ श्रेणी कर्मचारी दीपक बामणे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवानिवृत्ती शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन सावर्डे विद्यालयाच्या भाऊसाहेब महाडिक सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम,ज्येष्ठ संचालक मारूतीराव घाग,चंद्रकांत सुर्वे, मानसिंग महाडिक, आकांक्षा पवार, शांताराम खानविलकर, कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जीवनगौरव पुरस्कार विजेते प्रकाशजी राजेशिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश उपाध्यक्षा पूजा निकम,सचिव महेश महाडिक, संस्था पदाधिकारी, शालेय समितीचे सदस्य, माजी मुख्याध्यापक,संस्थेच्या विविध शाखेचे प्राचार्य,मुख्याध्यापक व बहुसंख्येने ग्रामस्थ, सत्कारमूर्तींचे कुटुंबीय, मित्र, विद्यार्थी, नातेवाईक तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध पैलूंचा आढावा अमृता घाग व अशोक शितोळे यांनी घेतला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी या दोन्ही सेवानिवृत्त अध्यापकांना शाल व बुके देऊन आरोग्यदायी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या एमसीव्हींसी विभागाच्या वतीने संदीप पवार यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे रेखाचित्र व गजानन गावडे यांनी त्यांचे ब्लड रिपोर्ट सुपूर्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पवार यांनी केले.