
मंडणगड : आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गावर चिंचाळी धरणाजवळील नादुरुस्थ पुलाचे समस्येसंदर्भात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने तहसिलदार अक्षय ढाकणे यांची 20 जुन 2025 रोजी भेट घेऊन निवेदन त्यांच्याकडे सादर करण्यात आले. निवेदनातील माहीतीनुसार मंडणगडमधून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चिंचाळी धरणा जवळ असलेला पुल रात्रीचे वेळी कोसळल्याची अफवा परिसरातील गावात पसरल्याने आजुबाजूच्या गावात खळबळ उडाली या रस्त्यावरुन दापोली व मंडणगड जाणारी वाहनांची मोठी वर्दळ असल्याने काही गावातील मंडळीनी जमा होऊन घटनास्थळी पाहणी केली असताना पुलाच्या खालच्या बाजूस मोठ्या भेगा पडल्याचे दिसून आले यामुळे येथे भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन वर्षापासून या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे पंरतू सद्यस्थितीत जुन्या पुलावरुन वाहतूक सुरु आहे. या पुलाचे खांबावर झाडे उकडून पडल्याने पुलाचे कटडे तुटले आहेत. एकंदरीत पुल धोकादायक झालेला असला तरीही तसे फलकही प्रशासनाकडून लावण्यात आलेले नाहीत. इंद्रायणी पुलाचे दुर्घटनेची घटना लक्षात घेता लवकरच गांभीर्याने आपल्या माध्यमातून नादुरुस्थ पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन किमान पुल धोकादायक असल्याचा फलक लावण्यात यावा.
सद्यस्थितीत मंडणगड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असून सदर रस्त्याने मंडणगड मुंबई सारख्या आणि कोकणातील पर्यटकांची वर्दळ जास्त असल्याने तसेच येणारे गणपती सणाच्या गाड्यांची वाहतूक नजरे समोर ठेवून आपण या गोष्टीकडे जातीने लक्ष देवून संबंधीत ठेकेदार व यंत्रणेस यांना याबद्दल सुचित करुन उपाययोजना करुन संभवणारा धोका टाळावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर, तालुका संघटक जितेंद्र दवंडे यांच्या सह्या आहेत. यावेळी बाळा खेडेकेर, जितेंद्र दवंडे यांच्यासह दशरथ सापटे, सुषमा राणे, अरविंद येलवे, कलंदर मुंगरुस्कर, अमित चिले आदी उपस्थित होते.