
चिपळूण : शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक आणि चिपळूण मधील हजारो विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक, गोडबोले'ज क्लासेस चे संस्थापक संचालक प्रा.अमेय सुरेश गोडबोलेंंचा, शिक्षण क्षेत्रातील योगदाना बद्दल, आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम भारत पुरस्काराने मुंबई येथे सन्मान झाला.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने,आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम भारत पुरस्कार चे ५ वे पर्व समारंभ, आज शुुक्रवार, ता.३० मे २०२५ रोजी, सायंकाळी ६ वाजता, यशवंतराव चव्हाण रंगमंच, नरिमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन फॅशन जगातील गुरु व इंटरनॅशनल फॅशन आयकॉन सोनिया मेयर यांनी केले होते. सामाजिक, वैद्यकीय, शिक्षण, शासकीय, कला आदी विविध क्षेत्रात मोलाचे योगदान असणाऱ्या ५० व्यक्तींचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
यामध्ये प्रसिद्ध गायक उदीत नारायण, फिल्म डायरेक्टर रमेश सिप्पी, संगीतकार तौसिफ कुरेशी, मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर मंगल प्रभात लोढा, समीर वानखेडे, सिने अभिनेत्री हेमा मालिनी, ब्युटीशियन नीता पारेख, निवृत्त सेना अधिकारी कर्नल राजकुमार सिंग आदी दिगग्जांचा सहभाग होता. याच कार्यक्रमात, वरिल विविध क्षेत्रातील दिग्गजांंसोबत चिपळूणमधील गोडबोले'ज क्लासेस चे संस्थापक संचालक प्रा.अमेय सुरेश गोडबोले यांना देखील याच कार्मक्रमात त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदाना बद्दल, आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम भारत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रा. अमेय गोडबोले यांना हा पुरस्कार डॉ. अब्दुल कलाम यांचे नातेवाईक ए.पी.जे.एम.सी.सलीम शेख आणि डॉ. अर्षी अयुब झवेरी (सीईओ ट्रस्ट ट्रेड ग्रुप,वरिष्ठ सल्लागार, रॉयल फॅमिली ऑफिसर) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळणारे डॉ. गोडबोले हे कोकणातील पहिले व्यक्ती आहेत.