पावसाळ्यातील संभाव्य धोके ओळखून अधिकाऱ्यांनी सतर्क रहा : उदय सामंत

मान्सून पूर्व आढावा बैठकीत दिल्या अधिकाऱ्यांना सूचना
Edited by:
Published on: May 23, 2025 15:33 PM
views 120  views

चिपळूण : गेल्या दोन दिवसांमध्ये दखल घेण्यासारखा पाऊस चिपळूण आणि गुहागर तालुक्यामध्ये पडला आहे. त्यामुळे पुढे पडणारा पाऊस कशाप्रकारे असेल याचे संकेत जणू  निसर्गाने आधीच  दिलेले आहेत. यासाठी सर्व प्रशासनाने आणि अधिकाऱ्यांनी सतर्क रहावे.  नियोजन फक्त कागदावर नसावे तर ते प्रत्यक्षात कृतीतून झाले पाहिजे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना  दिल्या असल्याची माहिती  उद्योग मंत्री, भाषा मंत्री आणि पालकमंत्री  ना उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

चिपळूण येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते. आढावा बैठक संपल्यानंतर  त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, प्रांताधिकाऱ्यांनी एक चांगला आराखडा बनवला आहे. नियोजनबद्ध माहिती आराखड्यातून दिसून येत आहे. आतापर्यंत ज्यांनी केलेले सर्व कामाची माहिती त्यांच्या या आराखड्यातून  समोर आली आहे .  परंतु प्रत्यक्ष ज्यावेळी घटना घडतात अशावेळी सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.  मान्सून पूर्व आढावा बैठकीतील माहिती त्यांनी देताना सांगितले की,  गेल्या दोन दिवसांमध्ये चिपळूण व  गुहागर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडला असून यामुळे थोड फार जनजीवन विस्कळीत  झाले. काही ठिकाणी वीज पडून दुर्घटना झाल्या आहेत.  मात्र याची दखल आत्ताच घेतली पाहिजे.  पुढे कसा पाऊस पडण्याची शक्यता आहे याचे संकेत निसर्गाने सुद्धा दिले आहेत. अधिकाऱ्यांनी सतर्क असणे गरजेचे आहे . मान्सूनपूर्व जिल्हा बैठक यापूर्वी जिल्ह्यास्तरावर होत होत्या.    मात्र आपण आता तालुकास्तरावर घेऊन सर्व अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच ही चिपळूण आणि गुहागर  तालुक्यातील  आढावा पालक मंत्री म्हणून या बैठक घेत आहे.  या बैठकीत  सांगितले की,  मुंबई गोवा महामार्गावरील मातीच्या ढिगाऱ्यांचा प्रश्न सुद्धा मार्गी लावण्यात आलेला आहे. याच महामार्गावर  असणारे रेस्ट हाऊस सुधारण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे.  त्याचबरोबर शहरातील नालेसफाईंचे काम सुद्धा होत आहे. ज्या ज्या भागात नालेसफाई होत नाही किंवा अशा मुळे पाणी तुंबले जाते आणि वस्तीमध्ये पाणी भरते असे सर्व नाले यांची माहिती घेतली आहे.  साफसफाईचे काम चिपळूण शहरात सुरू आहे.  त्याचबरोबर धरणे  ज्या भागात आहेत. त्या धरणांची मान्सूनपूर्वक तपासणी सुद्धा करण्यात आलेली आहे. कुठल्या धरणाची काय स्थिती आहे याचा सुद्धा आढावा त्यांनी या बैठकीत घेतल्याचे सांगितले. जास्त पाऊस पडल्यानंतर किंवा वादळ पाऊस असतो. अशावेळी पाणी भरणे, दरड कोसळणे, अशा दुर्घटना घडतात. अशा वेळी लोकांना स्थलांतरित करावे लागते.   यासाठी त्यांनी बहुउद्देशीय निवारा केंद्रांची सुद्धा निर्मिती केल्याचे सांगितले . २  कोटी ४८  लाख खर्च करून ही बहुउद्देशी निवारा केंद्र दापोली, खेड आणि चिपळूण मधील काही भागात उभारण्यात येत आहेत. पावसाळ्यात त्याचा उपयोग  स्थलांतरित लोकांसाठी फायदेशीर होईल  तर पावसाळ्यानंतर सभागृह म्हणून याचा वापर करण्यात येईल, माहिती त्यांनी दिली. वाशिष्ठी नदीतील गाळा  मोठ्या प्रमाणात काढण्याचे काम सुरू आहे.  यातील काही गाळ स्थानिक लोकांनी नेला आहे.  डिसेंबरपासून   गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. 

यावेळी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडून सुद्धा शेतकऱ्यांना  शेतीसाठी मिळणारी खते आणि बी बियाणे याची माहिती घेतली. खते आणि बी बियाणे शेतकऱ्यांपर्यंत कशाप्रकारे पोहचली जातात त्यांचा  साठा किती आहे. तालुक्यासाठी मागणी किती आणि पुरवठा किती या संदर्भातील सुद्धा त्यांनी माहिती घेत पत्रकार परिषदेत  माहिती दिली. दरड क्षेत्र जिथे आहे.   त्या गावांची माहिती घेत अशा गावांसाठी फक्त नोटीस न देता तिथल्या स्थानिकांच्या संपर्कात राहून  माहिती घ्या आणि दुर्घटना होणार नाही याकडे लक्ष द्या. अशा सूचना सुद्धा यांनी केल्या आहेत.  वणवा लावला जातो. यासंदर्भा  विषय निघाल्यानंतर यावर ठोस कायदा करण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु ज्या भागात वणवा लागला जातो.. तिथे चौकशी करून पोलिसांनी एफआय आर दाखला करण्याच्या सूचना त्यांनी या आढावा बैठकीत दिल्याचे सांगितले. 

एकंदरी चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील मान्सून पूर्व आढावा बैठक  आणि उपस्थित सर्व अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला गुहागर प्रांताधिकारी आकाश लिगाडे,  तहसीलदार प्रवीण लोकरे,  उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र राजमाने,  गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील, उपविभागीय वनाधिकारी,  कार्यकारी अभियंता,  नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.