
चिपळूण : तालुक्यातील वेहेळे-राजवीरवाडी येथील रहिवासी व बांधकाम ठेकेदार नीलेश सदाशिव कदम यांची सुकन्या नेहा कदमने बारावी परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवत वाणिज्य शाखेत डीबीजे महाविद्यालयात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. याबद्दल नेहाचा कुणबी शिक्षण मंडळ आणि किसान नागरी पतपेढी संचालक मंडळाच्यावतीने सन्मान करण्यात आला आहे. सत्काराला उत्तर देताना नेहा कदमने, आपल्याला मिळालेल्या यशामध्ये आई-वडीलांसह मार्गदर्शक शिक्षकांचे मोठे योगदान असल्याचे सांगत पुढचे शिक्षण पुणे येथे घेणार असून सीए होण्याचा मानस व्यक्त केला.
यावेळी श्री दत्त एजन्सीचे मालक उद्योजक वसंत उदेग, विलास खेराडे, चंद्रकांत मांडवकर, सुहास चव्हाण, पंचायत समिती सदस्य रमेश राणे, पंचक्रोशी कुणबी समाज संस्था संस्थापक अध्यक्ष संजय जाबरे, माजी सैनिक दीपक राजवरी, नेहाची आई नीलम कदम यांच्यासह पदाधिकारी, प्राचार्य उपस्थित होते.