शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील नव्वद विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाण पत्र प्रदान...

Edited by:
Published on: December 27, 2024 21:16 PM
views 83  views

चिपळूण : कौशल्य विकास, रोजगार व नावीन्यता विभाग महाराष्ट्र राज्य व महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम अंतर्गत 

दि. २१ डिसेंबर रोजी शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवलीमधील नव्वद विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, रोजगार व नाविन्यता विभागाकडुन कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान करणयात आले.सन 2023 मध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ व कृषि कौशल्य विकास परीषद,नवी दिल्ली यांचेकडून शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयास कौशल्य विकास केंद्राची मान्यता प्राप्त झाली .याच माध्यमातून प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेमधुन महाविद्यालयामध्ये कृषि व्यवसाय अभ्यासक्रमावर आधारित मृदा व जल तपासणी तंत्रज्ञ, कृषि प्रक्षेत्र अधिकारी व फळ व भाजीपाला  निरजलीकरण तंत्रज्ञ या विषयांचा प्रशिक्षणासाठी समावेश करण्यात आला. तीन महीने चालणारे हे प्रशिक्षण महाविद्यालयतील नव्वद विद्यार्थ्यांकडून यशस्वी रित्या पुर्ण करणयात आले. सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखरजी निकम  व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे संकल्पनेतुन तयार झालेले हे कोकणातील एकमेव कृषि कौशल्य विकास केंद्र ठरले आहे ज्यांनी नव्वद विद्यार्थ्यांना  महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून प्रमाणीत केले आहे. कृषि पदवीधरांना रोजगारक्षम व उद्योजक बनविण्याच्या दृष्टिकोनातून हे एक उत्तम उदाहरण म्हणून नावारूपास येत आहे.या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य व कौशल्य विकास केंद्रप्रमुख डॉ.सुनितकुमार पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र प्रदान करणयात आले. विद्यार्थ्यांना प्रशिक्षक म्हणून प्रा.हरिश्चंद्र भागडे, प्रा.संग्राम ढेरे व प्रा.प्रणय ढेरे यांचे मार्गदर्शन लाभले . प्रशिक्षण समन्वयक म्हणून प्रा.प्रसाद साळुंके व नागेश सितारे यांनी काम पाहीले.