
चिपळूण : गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांची व्यवस्था आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून साकार होत असलेल्या वालोपे येथील चिपळूण रेल्वे स्टेशन परिसर सुशोभिकरणाचे काम जोमाने सुरु आहे. काल गुरूवारी, ता. २९ रोजी चिपळूण - संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी या कामाची पाहणी करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कार्यकारी अभियंता अमरजित रामसे, वालोपे माजी सरपंच रवींद्र तांबीटकर, संदेश गोरीवले, पिंट्या मयेकर, अमोल अवेरे, रवींद्र आयरे, अनिल काजवे, भाई साळवी, शैलेश तांबीटकर, उमेश आयरे, बापू साळूंखे आदी उपस्थित होते.