'चिपळूण'मध्ये सकाळी ८ - दुपारी २ पर्यंत मतमोजणी

Edited by: मनोज पवार
Published on: November 22, 2024 11:22 AM
views 129  views

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे ७९.०४ टक्के मतदान झालंय. यामध्ये १३४८८३ पुरुष , १४११८३ महिला मिळून एकूण २७६०६६ मतदार आहेत.  यापैकी ९५८१६ पुरुष, ९४७७६ महिला मिळून एकूण १९०५८२ मतदारांनीच मतदान केले. पेढे क्र.८ - १०७५, मुंढे तर्फे चिपळूण क्र. १२५- ११९१, पिंपळी बु-११२६, सावर्डे कासारवाडी- १०१७ या ४ केंद्रांवर सर्वात जास्त मतदान.  पैकी दोन केंद्रावर रात्री उशीरा ८ वाजेपर्यंत चालले. सायंकाळी ६ वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना चिठ्ठ्या देऊन मतदान घेण्यात आले.

तर खेर्डी क्र. ७९ केंद्रावर ८९.७२ टक्के मतदान झाले. ८० टक्के पेक्षा जास्त झालेली २७ मतदान केंद्र आहेत. तर कसबा संगमेश्वर क्र.२४६ वर ४२.५९ % सर्वात कमी मतदान झाले. कसबा संगमेश्वर क्र.२४८ - ५० आणि कडवई क्र.१८९- ४४.५९ % असे तीन केंद्रावर कमी मतदान झाले आहे. मतदार क्षेत्रात ३३६ केंद्रांपैकी मतदान सुरु होण्यापूर्वी झालेल्या माॅकपोलचे वेळी ३ केंद्रावर-  एका ठिकाणी व्हीव्हीपॅट,  दुसर्‍या ठिकाणी बीयु आणि तिसऱ्या ठिकाणी सीयु  बदलण्यात आले. प्रत्यक्ष मतदान सुरु झाल्यापासून कोठेही मशीन नादुरुस्त झाले नाहीत.  सर्व मतदान प्रक्रिया पूर्णत: व्यवस्थित पार पडली.

चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवार,  २३ नोव्हेंबर,  सकाळी ८ वाजता,  चिपळूण युनायटेड इंग्लिश स्कूल च्या गुरूदक्षिणा सभागृहात सुरु होईल. नोटा आणि सहा उमेदवार धरून कमी म्हणजे सातच उमेदवार असल्याने दुपारी २ वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.

सकाळी ८ वाजता- टपाली मतदान- २ आणि सर्व्हीस व्होटर - ८ अशी एकूण १० टेबलवर मतमोजणी होईल,  ८.३० पासून इव्हिएम मशीन ची मतमोजणी सुरुवात होईल. एका फेरीत- १४ टेबलवर- १४ मशीन प्रमाणे ३३६ मशीन , २४ फेऱ्यात ही मतमोजणी पूर्ण होईल.  एका फेरीला १५ ते २० मिनिटे कालावधी गृहीत धरल्यास,  ६ तासांत,  दुपारी २ वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल,  अशी माहिती चिपळूण चे प्रताधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली.

या मतमोजणीसाठी २०० ते ३०० पोलिस असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.चिपळूण शहरातील गुहागर विजापूर रस्त्यावरील चिंचनाका ते बहादूरशेख वरील वाहतूक सकाळी पाच वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली आहे.