
मंडणगड : मंडणगड तालुका कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष मुश्ताक मिरकर यांनी 6 ऑक्टोंबर 2025 रोजी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते व मंडणगड, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील आपल्या असंख्य समर्थकांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला.
भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात खासदार सुनील तटकरे व मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यात तालुक्याचे राजकीय वतुर्ळाच्या दृष्टीने अंत्यत महत्वाचा असलेला हा कार्यक्रम संपन्न झाला. श्री. मिरकर हे 2009 सालापासून तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तालुका समन्वय समिती अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना तालुका समिती अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य अशा विविध शासकीय समित्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या श्री. मिरकर यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल तालुक्यात विशेष आकर्षण आहे. कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन समविचारी पक्षात त्यांनी केलेला पक्ष प्रवेश आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांवर मोठा प्रभाव टाकण्याचे संकेत मिळत असताना त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीस तालुक्यासह मतदार संघात मोठे बळ मिळणार आहे.
या सोहळ्यास राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, अजय बिरवटकर, संदीप राजपुरे, प्रकाश शिगवण, साधना बोत्रे, रमेश दळवी, भाई पोस्टुरे, सतु कदम, रमा बेलोसे, नेहा जाधव, आदीती आमरे, समंद मांडलेकर, शाहजान हारविटकर, नगराध्यक्षा सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, रेश्मा मर्चंडे, प्रियांका लेंडे, सुभाष सापटे, दीनेश लेंडे, फौरोज उकये, राकेश साळुंखे, लुकमान चिखलकर, हरेष मर्चंडे यांच्यासह पार्टिचे मंडणगड व दापोली तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
पक्ष प्रवेशाचे निमीत्ताने मेळाव्यास मेळालेला प्रतिसाद पाहून खासदार सुनील तटकरे यांनी आजच्या पक्ष प्रवेशाने आपली ताकद व्दिगुणीत झालेली असल्याने या जनशक्तीचा वापर तालुक्याच्या विकासाचा नव्या अध्याय लिहण्यास उपयोगात आणुया असे सांगीतले. यावेळी मुश्ताक मिरकर यांनी माझ्या पंचक्रोशीचे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबीत असल्याने खासदार सुनील तटकरे यांचे नेतृत्व व समविचारी पक्षाचे तत्वज्ञान आजपासून अंगीकारत असल्याचे सांगीतले. या कार्यक्रमाचे प्रस्तावीक तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम तर सुत्रसंचालन नगरसेवक सुभाष सापटे यांनी केले.
फोटो ओळी- भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश करणाऱ्या मुश्ताक मिरकर यांचा सत्कार करताना खासदार सुनील तटकरे व कार्यकर्ते.










