
चिपळूण : साहित्य भारती (कोकण प्रांत) शाखा चिपळूण, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय या तीन संस्थांच्या सयुंक्त विद्यमाने महर्षी वाल्मिकी जयंतीच्या पूर्वसंध्येला प्रवचनकार प्रा. अंजली बर्वे यांचे ‘महर्षी वाल्मिकी आणि रामायण’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यानाचा कार्यक्रम शहरातील श्रीलक्ष्मीनारायण देवस्थान येथे सोमवारी (दि. ६) सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होईल. ‘महर्षी वाल्मिकी आणि रामायण’ या विषयीचे विचार ऐकण्यासाठी श्रोत्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य भारती चिपळूण शाखेच्या अध्यक्षा सौ. प्राची जोशी आणि कार्याध्यक्ष धीरज वाटेकर यांनी केले आहे. यापूर्वी यावर्षी शहरात साहित्य भारतीच्या वतीने, कालिदास जयंती, गुरुपौर्णिमा आदी प्रसंगी व्याख्यानाचे कार्यक्रम संपन्न झाले आहेत.










