आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गावर खड्डे

रस्ता वाहतुकीसाठी जीवघेणा
Edited by: मनोज पवार
Published on: October 03, 2025 15:02 PM
views 105  views

मंडणगड : आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गावर मंडणगड ते पाचरळ या अंतरात मान्सुनचे कालावधीत पडलेले खड्डे लहान गाड्यांचे वाहतूकीसाठी जीवघेणे व धोकादायक बनले आहेत. ऑक्टोंबर महिन्यात पावसाचा हंगाम संपत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मागील हंगामात बंद केलेल्या महामार्ग निर्मीतीचे कामास सुरुवात न केल्याने कामास तातडीने सुरुवात करुन खड्डे भरुन घेण्याची मागणी तालुक्यातून केली जात आहे.

गेल्या दशकात तालुक्याचा मुख्य रहदारीचा हा मार्ग सातत्याने नादुरुस्थ असल्याने रस्त्यामुळे दुचाकी तीनचाकी व लहान चारचाकी वहाने यांची सरासरी आर्युमान १५ वर्षांऐवजी ५ वर्ष इतके किमी झाले आहे. या शिवाय सर्वच  गाड्यांचा देखभाल दुरुस्तीचा खर्च दुप्पटीने वाढला आहे. खड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरीकांच्या जीवताची भिती निर्माण झाली आहे. गतवर्षी रस्त्यांचे निर्मीतीचे काम जोरकसपणे सुरु झाले मात्र जागोजागी जोड रस्त्याचे अपुऱ्या कामाचे तुकडे तसेच ठेवण्यात आले अनेक पुल व मोऱ्याची कामे आजही अर्धवट आहेत अनेक धोकादायक वळणे काम पुरे करण्याच्या नादात तशीच ठेवण्यात आली त्यामुळे बहुतांश कामे पुर्ण झाली तरी रस्ता पुर्ण झाला असे म्हणता येत नाही. रस्त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्याची तीव्रता व यादी दवसागणीक वाढतच आहे.

महामार्गवर मंडणगड ते म्हाप्रळ भिंगळोली समर्थ नगर ते मंडणगड, मंडणगड शहर ते दापोली पालवणी फाटा, पालवणी फाट ते तुळशी घाट या रहदारीचे ठिकाणी प्रचंड खड्डे पडले आहेत रस्त्याच्या कामासाठी जागोजागी खुदाई करण्यात आली आहे यातून गाड्या चालवणे जिकरीचे बनले आहे. तालुक्यात व्हीआयपी मंत्री व मोठ्या व्यकतींचे दौऱ्याकरिता महामार्ग प्राधिकरण रस्त्याच्या सज्जता करते यंदाचे मान्सुनचे हंगामात दोन वेळा खड्डे बूजवूले असताना सद्यस्थितीत भिंगळोली ते मंडणगड शहर या परिसरात रस्त्याची अक्षरशहा चाळण झाली आहे याकडे लक्ष देऊन प्राधिकरणाने रस्त्याचे कामास तातडीने सुरुवात करावी अशी मागणी तालुक्यातून केली जात आहे.

खड्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची चाळण झाली आहे. यंत्रणा केवळ मंत्र्याच्या दौऱ्याचे निमीत्ताने रस्त्याची जुजबी मलमपट्टी करते सर्व दोषाकडे प्राधिकरणाने दुर्लक्ष केले आहे. तांत्रीक चुकामुळे तुळशी व शेनाळे घटात वाहतूक धोकादायक बनली आहे. याकडे लक्ष देऊन नागरीकांना सुरक्षीत प्रवासाशी हमी प्राधिकरण व यंत्रणा कधी देणारअसा सवाल अऱविंद येलवे यांनी केलाय.