
चिपळूण : जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून (वर्लड फार्मासिस्ट डे २०२५), सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे येथे २५ आणि २६ सप्टेंबर २०२५ रोजी दोन दिवसीय फार्मा फेस्टचे उत्साहात आयोजन करण्यात आले. “थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या महोत्सवात विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्रातील त्यांच्या कौशल्यांचे दर्शन घडवले. या कार्यक्रमाला दिशा फाउंडेशन, खेर्डी, चिपळूण यांचे विशेष प्रायोजकत्व लाभले.
पहिला दिवस (२५ सप्टेंबर): कौशल्य स्पर्धां
पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक आणि प्रायोगिक कौशल्यांच्या तपासणीसाठी समर्पित होता. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिक्षण महर्षी गोविंदराव निकम सभागृहात स्पर्धा सुरू झाल्या. यात ‘डर्मा फार्माकाऑन नेक्स्स' (दोन तासांत आयुर्वेदिक व रासायनिक-मुक्त सौंदर्यप्रसाधने तयार करणे), ‘बी द ब्रांड ’ (५ मिनिटांचे नैतिक जाहिरात पथनाट्य), ‘नो युवर पीलस’ (३० सेकंदांची जलद औषध ओळख स्पर्धा), आणि ‘आर एकॖस’ (क्लिनिकल केस स्टडीवर आधारित अचूक प्रिस्क्रिप्शन लेखन) या प्रमुख स्पर्धांचा समावेश होता.
दुसरा दिवस (२६ सप्टेंबर) : मार्गदर्शन आणि गौरव सोहळा
दोन दिवसीय “आवरा द जीनसिओपिन फार्मा फेस्ट” चा समारोप सोहळा २६ सप्टेंबर रोजी कॉलेजच्या शिक्षण महर्षी गोविंदराव निकम सभागृहात आयोजित करण्यात आला. या सोहळ्यासाठी औषध प्रशासनाचे (FDA) सहाय्यक आयुक्त शशिकांत यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
समारंभाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. उपप्राचार्य प्रवीण वाघचौरे, गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी यांनी प्रमुख पाहुणे शशिकांत यादव आणि प्राचार्य संजय देसाई, कॉलेज ऑफ फार्मसी पॉली यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर, सर्व प्राधयापक व विद्यार्थ्यांनी फार्मासिस्टची शपथ घेतली. प्रमुख पाहुणे शशिकांत यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तयांचा त्यांचा डी.फार्म, बी.फार्म आणि एम.फार्मपर्यंतचे शिक्षण, १२ वर्षांचा औद्योगिक अनुभव (रुबिकॉन रिसर्च, पिरॅमल रिसर्च) तसेच औषध प्रशासनातील आपल्या कार्याचा संक्षिप्त आढावा दिला. या प्रसंगी, विद्यार्थ्यांनी तयार केलेले सामाजिक फार्मा संदेशाचे व्हिडिओ दाखवण्यात आले, ज्यामुळे आरोग्य विषयक जागरूकता वाढली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दोन दिवसांतील सर्व स्पर्धांमधील विजेत्यांना प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि समन्वय प्रतीक्षा निकम आणि पारस चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.










