धनश्री शिंदे यांचा उपक्रम कौतुकास्पद : विनायक राऊत

धनश्री शिंदे यांच्या प्रयत्नातून मोफत बस सेवेचा शुभारंभ
Edited by: मनोज पवार
Published on: September 26, 2025 19:51 PM
views 311  views

चिपळूण : धनश्री शिंदे यांनी नवरात्र उत्सवानिमित्त अलोरे जिल्हा परिषद गटातील महिलांसाठी देवी दर्शना करीता मोफत वीस बसेसची व्यवस्था केली आहे.ही कौतुकास्पद बाब आहे आई जगदंबे आणि या भगिनींचा  आशीर्वाद त्यांच्यावर सदैव राहील अशी प्रतिक्रिया रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार उबाठा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हाउपसंघटिका माजी सभापती धनश्री रवींद्र शिंदे यांच्या वतीने चिपळूण तालुक्यातील महिलांकरता वीस बसेस द्वारे मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी सकाळी चिपळूण तालुक्यातील दसपटी येथील श्री देवी रामवरदायीनी मंदिरात शिवसेना सचिव माजी खा.विनायक राऊत,माजी आ.बाळासाहे माने  यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मोफत बस सेवा सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.नवरात्रोत्सव काळात या बसेस चिपळूण तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये दर्शनांकरता महिलांना मोफत सोडण्यात आल्या चिपळूणच्या माजी सभापती धनश्री शिंदे महिलांसाठी ठरल्या खऱ्या नवदुर्गा ठरल्या आहेत अशा प्रतिक्रिया महिला वर्गामध्ये उमटत आहेत. स्वखर्चाने वीस बसेस देऊन महिलांसाठी  देवदर्शन यात्रा करून दिल्यामुळे  महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी माजी खा.विनायक राऊत,माजी आ.बाळासाहेब माने,जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस,चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्र प्रमुख बाळा कदम, उबाठा शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख बळीराम गुजर,शहरप्रमुख भैया कदम,युवासेना तालुका प्रमुख उमेश खताते,ऐश्वर्या घोसाळकर उप जिल्हा संघटक संगमेश्वर तालुका युवती सेना तालुका प्रमुख शिवानी कासार,उपतालुकाप्रमुख रेश्मा चव्हाण,विभाग प्रमुख सचिन शेट्ये,उपशहरप्रमुख संजय रेडीज, विभागप्रमुख राजा नारकर,विभाग प्रमुख अजित गुजर,विभाग प्रमुख सागर सावंत,रवींद्र खेतले,युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे,महिला आघाडी शहरप्रमुख वैशाली शिंदे, महिला आघाडी शहर समन्वयक श्रद्धा घाडगे, महिला आघाडी शहर विभागप्रमुख तृप्ती कासेकर, सायली कदम,तालुका सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे,शहर सचिव प्रशांत मुळे आदी मान्यवर उपस्थित  होते.