
मंडणगड : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत दि. 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचे औचित्य साधून लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विस्तार विभाग यांच्या वतीने व नगरपंचायत मंडणगड यांच्या सहकार्याने या मोहिमे अंतर्गत मंडणगड बस स्टॅन्ड परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्याथ्र्यांनी स्वच्छतेविषयी महत्व सांगणा-या घोशणा दिल्या. त्यानंतर प्रा. संदीप निर्वाण यांनी सार्वजनिक आरोग्याच्या अनुषंगाने स्वच्छतेचे उपक्रम हे महत्वाचे असल्याचे सांगितले तर प्रा. हनुमंत सुतार यांनी स्वच्छतेविषयी थोडक्यात माहिती सांगितली.
त्यानंतर नगर पंचायत मंडणगड येथील कर्मचा-यांच्या सहकार्याने बस स्टॅड परिसरात स्वच्छता करण्यात आली. यामध्ये उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. संगीता घाडगे, डॉ. महेश कुलकर्णी, तसेच मंडणगड नगरपंचायतचे स्वच्छता विभाग प्रमुख श्री. विकास साळवी, स्वच्छता शहर समन्वयक श्री. रोशन बेलोसे, नितेश लेंडे, समीर साळवी, गणेश सापटे, प्रमोद मर्चंडे व इतर स्वच्छता कर्मचारी आणि महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयाचे सर्व स्वयंसेवक सहभागी झाले होते.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उपप्रचार्य डॉ. विष्णु जायभाये व नगराध्यक्षा सोनाली बेर्डे, मुख्याधिकारी श्री. महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एन. एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, प्रा. हनुमंत सुतार, श्री. विकास साळवी, श्री. रोशन बेलोसे व एन. एस. एस. प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले. शेवटी डॉ. संगीता घाडगे यांनी सर्वांचे आभार मानले.










