
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे गोवळवाडी येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले. स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार कोयना भूकंप पुनर्वसन योजनेतून या सभागृहासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या निमित्ताने आमदार निकम म्हणाले की, “सभागृहामुळे सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांना चालना मिळून ग्रामविकासाला बळकटी मिळणार आहे.
या कार्यक्रमाला पांडूशेठ माळी, शेखर उकार्डे, नाना कांगणे, जाकिर शेखासन, गणपत चव्हाण, अक्षय चव्हाण, सुशिल भायजे, दत्ताराम भायजे, शांताराम भायजे, अण्णा शिगवण, गणपत भायजे, सुभाष शिगवण, काशिराम शिगवण, राजाराम भायजे, सुरेश भायजे, रामचंद्र बेंडके, दिपक शिगवण, सुयोग भायजे, सुरेश रामाणे, लहू सुर्वे, दत्ताराम मेस्त्री, महादेव पडवे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










