
चिपळूण : नॅब चिपळूण जिल्हा शाखा रत्नागिरी वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील दृष्टीबाधित आदेश खंदारे यांचे व्यवसायिक पुर्नवसन करून अंघ बांधवाला व्यवसायिक दृष्टी प्राप्त करून दिली आहे. आदेश खंदारे हे लांजा तालुक्यातील बोरवले गावचे रहाणार असुन १००% अंध आहेत. मागील वर्षी स्वयंसिद्धता व मसाज प्रशिक्षण नॅब च्या माध्यमातून पुर्ण केले व आता आपल्या गावाच्या जवळपास नागरीकांना मसाज सेवा देण्याचा मानस असल्याने संस्थेच्या माध्यमातून त्याला कांस्य थाली मसाजर देण्यात आला.
याप्रसंगी बोलताना नॅबचे अध्यक्ष सुचय अण्णा रेडीज यांनी सांगितले की, कोकणामध्ये विशेषत रत्नागिरी जिल्ह्यात आपले अंध बांधव मसाज करून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. तर आम्ही त्यांना त्यांच्या व्यवसायाला बळ येण्यासाठी मदत करण्यास कटीबद्ध आहोत. संस्थेच्या माध्यमातून अंत्रवली येथील बाळू मोहीते, विल्ये येथील सौ. प्रगती तावडे, कोंड आंबव येथील गोविंद पांचाळ, लोटे येथील राकेश चाळके चिपळूण येथील सुरज राठोड हे सर्व १००% दृष्टी बाधित असुन रुणांना तसेच लोकांना मसाज सेवा देत आहेत. या कार्यक्रम प्रसंगी आदेश खंदारे याला अध्यक्ष सुचय रेडीज, कार्यवाह निलेश भुरण, ॲड. विवेक रेळेकर, सलीम पालोजी, सतीश विरकर, प्रकाश पाथरे , भरत नांदगावकर यांच्या उपस्थितीत कांस्य थाळी मसाजर देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विकास अधिकारी संदीप नलावडे आणि सहकारी यांनी परिश्रम घेतले.