मळेवाड इथं होणार बाल साहित्य संमेलन व बाल संसद

अध्यक्षस्थानी बाल साहित्यिक वैष्णवी मिलिंद मुळीक तर सुचिता सचिन कारुडेकर उद्घाटक
Edited by: विनायक गांवस
Published on: January 03, 2023 18:05 PM
views 177  views

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व मळेवाड कोंडुरा ग्रामपंचायतच्या वतीने येत्या बुधवार दि.४ जानेवारी रोजी मळेवाड प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे जिल्हास्तरीय बाल साहित्य संमेलन व बाल संसद भरवण्यात येणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी शालेय बाल साहित्यिक वैष्णवी मिलिंद मुळीक तर उद्घाटक म्हणून सुचिता सचिन कारुडेकर, प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ मुस्ताक शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के ,गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, केंद्रप्रमुख म.ल. देसाई,वैष्णवी मुकुंद नाईक, आदी उपस्थित राहणार आहेत.


सकाळी ९.३० वाजता शाळा क्रमांक १ मळेवाड येथून ग्रंथदिंडी मळेवाड नाका येथे समारोप, त्यानंतर १० ते १०.३० वाजता मळेवाड शाळा क्रमांक २ येथे आगमन, १०.३० ते ११.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन ११.३० ते १२ बालकांचा परिसंवाद १२ ते १२.३० वाजता लेखकांची मुलाखत, १२.३० ते १.३० वाजता बालकवी संमेलन ,त्यानंतर दुसऱ्या सत्रात २.३० ते.३.३० वाजता बाल संसद ,३.३० ते ४ वाजता बालरंजन कार्यक्रम, आवाज आर्ट फाउंडेशन ४ ते ४.३० वाजता होणार आहे. आभार व समारोप सन्मान सोहळा आदी कार्यक्रम होणार आहेत. ग्रामीण स्तरावरील शाळकरी मुलां मध्ये साहित्य चळवळ रुजावी या हेतूने हे बाल साहित्य संमेलन व बाल संसद भरवण्यात येत आहे .न्यायालय प्रक्रिया व आजचे वास्तववादी जीवन प्रणाली यावरील प्रश्न व समस्या मुलांना समजावेत. या दृष्टीने ही बाल संसद भरवण्यात येत आहे. बालसाहित्य संमेलन व ग्रंथदिंडी तसेच परिसंवाद आदींमध्ये ज्या शाळा, मुलांनी सहभाग घेतला त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या बाल साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोमसाप तालुकाध्यक्षॲड  संतोष सावंत ,जिल्हा सचिव विठ्ठल कदम, तालुका सचिव प्रतिभा चव्हाण, सरपंच मिलन पार्सेकर आदींनी केले आहे.