शिक्षणमंत्र्यांनी सावंतवाडीतील कार्यालयात साजरा केला बालदिन !

श्रेया खोत हिला गिफ्ट देत दिल्या शुभेच्छा
Edited by: ब्युरो
Published on: November 14, 2023 18:53 PM
views 215  views

सावंतवाडी : 14 नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन. याच दिवशी बाल दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यभर शाळांना सुट्टी असल्याने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या कार्यालयात हा बालदिन साजरा केला.  

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या कार्यालयात प्रतिधनिक स्वरूपात बालदिन साजरा केला. यासाठी श्रेया श्रीकृष्ण खोत ही विद्यार्थिनी लकी ठरली. आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल आरोस दांडेलीची इयत्ता पाचवीची ही विद्यार्थिनी आहे. श्रेयाला खास भेटवस्तू देत मंत्री केसरकर यांनी शुभेच्छा दिल्यात. तसेच, सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी बालदिनाच्या शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाचं महत्व समजून घेण्याचा सल्ला दिला.