देवगडमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 11, 2025 20:40 PM
views 15  views

देवगड : देवगडमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान बाबत कार्यशाळा राबविण्यात येणार असून या कार्यशाळेचे १२ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजन करण्यात आले असुन देवगड तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींमध्ये सदरचे अभियान राबविणेत येणार आहे. १ ऑगस्ट २०२५ पासुन यासाठी नियोजन करण्यात आलेले होते. या कार्यशाळेत सरपंच , ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम पंचायत सदस्य , ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामरोजगार सेवक तसेच पर्यवेक्षक व तालुकास्तरीय अधिकारी इंदप्रस्थ सभागृह देवगड येथे उपस्थित राहणार असल्याबाबतची माहिती गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण यांनी दिली. 

महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान राबविणेत येणार असुन त्यात ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणुन प्रामुुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना त्यांचे कामगिरी नुसार प्रोत्साहीत करून त्यांची कार्यक्षमता वाढविणेकरीता उत्कृष्ट ग्रामपंचायत , पंचायत समिती व जिल्हा परीषदांसाठी सन २०२५ / २६ या आर्थिक वर्षापासुन तालुका, जिल्हा विभाग व राज्य अशा चार स्तरावर प्रोत्साहन देणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ३ ग्रामसभा घेणेत येणार असून त्यामध्ये १७ सप्टेंबर रोजी शुभारंभाची ग्रामसभा मतदारांच्या बहुसंख्य उपस्थितीत पार पडणार आहे. या करीता तालुकास्तरावरून संपर्क अधिकाऱ्यांच्या व पर्यवेक्षकांचा नेमणुका करणेत आलेल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहेत.

अभियान कालावधीत सर्व मुद्दावर कार्यवाही करणेत येणार असून दैनंदिन अहवाल संबंधीत App वर पाठविणेत येणार आहेत. हे अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सर्व अभियाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची प्रभावी अमंलबजावणी करणेत येणार आहे. गटातील सर्व ७२ ग्रामपंचायतीं सहभागी असुन सदरचे अभियान प्रभावीपणे राबविणेत येणार आहे व त्या बाबतचे संपुर्ण नियोजन करण्यात आलेले असून त्या नुसार अंमलबजावणी करण्यात येणार
असून याअभियानामध्ये सुशासन, सक्षम पंचायत, जलसमृद्ध व हरीतगांव , योजनांचे अभिसरण , गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजिविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान इत्यादी या अभियानाचे मुख्य घटक असणार आहेत.