आता जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष

सुनील कुंडगीर यांनी दिली माहिती
Edited by: दिपेश परब
Published on: July 25, 2025 13:55 PM
views 97  views

वेंगुर्ला : आर्थिक दृष्ट्या गरजु रुग्णांना तातडीच्या व अत्यावश्यक आजारांवर उपचार मिळणेकरीता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्यस्तरीय कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या देखरेखीत " मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष " जिल्हास्तरावर सुरु करण्यात आला आहे. 

समाजातील गरिब व गरजु रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, धर्मदाय रुग्णालया अंतर्गत मोफत उपचार करून देणे, महात्मा फुले जन आरोग्य योजना ,आयुष्यमान भारत योजनेसह इतर योजनांची माहीती व सुविधा रुग्णांना मिळवुन देणे तसेच योजनेच्या बाहेर असलेल्या रुग्णांना " मुख्यमंत्री सहायता निधी" अंतर्गत मदत पुरविणे हे या कक्षाचे प्रमुख उद्दीष्ट असल्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कक्षाचे सुनिल कुंडगीर यांनी मार्गदर्शन केले.

तसेच या कक्षाद्वारे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी अर्थसहाय्य पुरविले जाते. तसेच पुर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात, मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित नागरीकांना मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते असे मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी साठी अर्ज करतेवेळी लागणारी कागदपत्रे तसेच या योजनेंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या आजारांची यादी बाबतची माहीतीचे फाॅर्म वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष पपु परब, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, शिरोडा ग्रा प सदस्य मयूरेश शिरोडकर, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, युवा मोर्चाचे राहुल गावडे आदी उपस्थित होते.