'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' मोठ्या बक्षिसांची जोड

ग्रामपंचायतींना विकास कामांची लागणार ओढ
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 10, 2025 16:57 PM
views 229  views

कुडाळ : ग्रामीण विकासातून खेडी समृद्ध करणे यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत हे अभियान महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवले जाणार आहे. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा दिनी याची सुरुवात होणार आहे. 11 सप्टेंबर रोजी याची कार्यशाळा ओरोस येथे होणार आहे.

 पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हापरिषद कर्मचारी या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत जिल्हा परिषद अधिकारी व ग्रामपंचायत यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. 12 सप्टेंबर रोजी कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे सकाळी 10 वाजता आमदार निलेश राणे अध्यक्ष स्थानी उपस्थित राहणार आहेत. 

तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.आजवर राबवण्यात आलेल्या अभियानांपेक्षा सर्वात मोठ्या रकमेची बक्षीस या स्पर्धेत देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर एकूण 35 लाखांच्या बक्षिसांची रक्कम प्रथम 15 लाख, द्वितीय 12 लाख, तृतीय 8 लाख अशा क्रमांकात दिले जाणार आहे. जिल्हास्तरावरती या स्पर्धेमध्ये प्रथम 50 लाख द्वितीय 30 लाख तृतीय 20 लाख अशी बक्षिसांची रक्कम आहे. यातून जिंकलेल्या ग्रामपंचायती विभाग स्तरावर गेल्यावर प्रथम एक कोटी द्वितीय 80 लाख तृतीय साठ लाख अशी बक्षीस ठेवण्यात आलेली आहे. राज्यस्तरावर निवड झालेल्यांना प्रथम क्रमांक पाच कोटी द्वितीयेला तीन कोटी तृतीयेला दोन कोटी अशी भव्य बक्षीसांची रक्कम या स्पर्धेमध्ये मिळणार आहे. या बक्षीसांमुळे ग्रामपंचायत मध्ये विकास कामांसाठी स्पर्धा रंगणार आहेत आणि या स्पर्धेंमधूनच ग्रामपंचायतीने चांगले काम करावे यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. 

पूर्वी या कामांना 31 मार्च चा निकष होता मात्र यावेळी ही काम 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करायची आहे. या स्पर्धेसाठी सहा मुद्द्यांवर काम करणे गरजेचे आहे. पहिला मुद्दा आहे सक्षम ग्रामपंचायत लोकाभिमुख प्रशासन, गावाच्या तक्रारींची निराकरण करणे, ई सेवा सुविधा केंद्रांचे बळकटीकरण, ग्रामपंचायतची वेबसाईट तयार करणे, दप्तर वर लेखापरीक्षण अद्यावत करणे, ग्रामपंचायत सभा व सभांमध्ये उपस्थिती यात लोकांचा सहभाग वाढवणे, ग्रामविका समितीच्या कामकाजात सुधारणा करणे, दिव्यांगाने ओळखपत्र देणे, आयुष्यमान कार्ड साठी काम करणे, 

दुसरा मुद्दा ग्रामपंचायत सक्षमीकरण  करवसुली, पाणीपट्टी वसुली, लोकसहभाग वाढवणे, सी एस आर फंड मधून जास्त रकमा घेऊन गावाचा विकास करणे, ग्रामपंचायत उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणे,

तिसरा मुद्दा जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव पाण्याचा ताळेबंद, स्वच्छ पाण्याचा पुरवठा, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्ष लागवड, प्लास्टिक बंदी, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन,

चौथा मुद्दा मनरेगा प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजना, मनरेगातून खर्चावर अभिसरण करणे, नवीन विहिरी, विहिरींचं पुनर्भरण, जनावरांचा गोठा, कुक्कुटपालन, 

पाचवा मुद्दा शाळा अंगणवाडी यांचे डिजिटल रूपांतर करणे, पशुवैद्यकीय उपचार केंद्र, स्मशानभूमी, व्यायामशाळा, धार्मिक स्थळे यांची सुशोभीकरण करणे,

सहावा मुद्दा गावांमध्ये उपजीविकेचे साधन निर्माण करणे, घरकुल योजनेची कामे मार्गे लावणे, गावातील महिलांना बचत गटांमध्ये समाविष्ट करणे, बचत गटांना उर्जितावस्थेत आणणे, बचत गटांना वित्त व कर्ज पुरवठा कसा मिळेल हे पाहणे, बचत गटांना प्रशिक्षण देणे, लखपती दीदी योजनेचा प्रसार करणे, सुशिक्षित घटकांना प्रशिक्षण देणे, वंचित घटकांना प्रशिक्षण देणे, गावातील शेतकऱ्यांची शेती गट निर्माण करणे, शेतमालाला बाजारपेठ निर्माण करणे, ॲनिमिया मुक्त गाव करणे,

सातवा मुद्दा लोकसहभाग व श्रमदान, आठवड्यातून एकदा लोकांना श्रमदावण्यासाठी प्रवृत्त करणे, पाणी उडवण्याच्या मोहिमा बंदरे यात सहभाग घेणे, पानंद रस्ते दुरुस्तीमध्ये सहभाग घेणे, ग्रामपंचायत ने वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम घेणे, 

वरील कामांवरती ग्रामपंचायतींना शंभर गुणांपैकी गुण दिले जाणार आहेत आणि याच्यातूनच ग्रामपंचायतची बक्षिसाकडे वाटचाल होणार आहे. ग्रामपंचायतीने चांगले काम करावे यासाठी हे प्रोत्साहन पर बक्षीस आहे. प्रफुल्ल वालावलकर बिडीओ, संजय ओरोस्कर ग्रामविस्तार अधिकारी, मृणाल कार्लेकर अधिक्षक यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.