
दोडामार्ग : दोडामार्ग येथील श्री देव पिंपळेश्वरच्या 18 व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवार 10 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासाचा छावा हा नाट्यप्रयोग दोडामार्ग येथे सादर होणार आहे.
गोवा येथील प्रसिद्ध नाट्यसंपदा छावा या नाट्यपुष्पाचे लेखक शिवाजी सावंत, दिगदर्शक चंद्रशेखर गवस आणि नृत्य दिग्दर्शिका सरोज बिचोलकर यांच्या छावा या नाट्यप्रयोगाला गोवा, सिंधुरग व कर्नाटक राज्यात उदंड असा प्रतिसाद लाभला. दोडामार्ग ससोली येथील प्रसिद्ध कलाकर चंद्रशेखर गवस हे या नाटकाटील मुख्य संभाजी महाराजांची भूमिका बजावणार आहेत. या नाट्यमालिकेत खास राज्याभिशेख सोहळा खास आकर्षण दाखविले जाणार आहे. तरी तमाम नाट्य रसिकांनि याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.