छत्रपती शिवराय जीवन जगण्याचे सर्वोच्च परिमाण ! - प्रा. रुपेश पाटील

हळदोणे - गोवा येथील व्याख्यानात प्रतिपादन
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: March 12, 2023 13:57 PM
views 246  views

सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर शिवाजी म्हणजे एक प्रचंड विचार शस्त्र आहेत. अखिल विश्वाला वंदनीय असणारे,  प्रत्येक महाराष्ट्रवासियांच्या नव्हे तर प्रत्येक भारती यांच्या हृदयात वसलेले सर्वोच्च जाणते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवाजी म्हणजे केवळ नाव नाही तर जीवन जगण्याचे एक सर्वोच्च परिमाण आहेत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शिवव्याख्याते तथा कोकण  प्रा. रुपेश पाटील यांनी हळदोणे (गोवा) येथील व्याख्यानात व्यक्त केले.

 हळदोणे येथील छत्रपती शिवराज्य प्रतिष्ठान यांच्यावतीने प्रा. रुपेश पाटील यांचे शिवजयंती उत्सव प्रीत्यर्थ 'शिव-शंभू आपले अखंड प्रेरणास्त्रोत' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष  गोविंद गोवेकर होते.

 दरम्यान आपल्या व्याख्यानातून प्रा. रुपेश पाटील यांनी छत्रपती शिवरायांची शिवनीती तसेच गनिमी कावा आणि छत्रपती शिवरायांना साथ देणाऱ्या, निर्भिड बलिदान देऊन स्वराज्यासाठी झुंजणाऱ्या अनेक रणझुंजार वीरांच्या गाथा सांगून व्याख्यानातून प्रबोधन केले. प्रा. पाटील पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज का घडले?, कसे घडले?, की जाणीवपूर्वक त्यांना माँसाहेब जिजाऊ यांनी घडविले याची जाणीव प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन सारख्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज जाणून घेताना प्रचंड उत्सुकता आहे, असे असताना आजची तरुणाई केवळ छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर डोक्यावर फेटा बांधून आणि आपल्या खांद्यावर भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवराय यांचा प्रचंड जोशात   जयघोष करतात. मात्र हा जयघोष करत असताना छत्रपती शिवरायांचा एक विचार तरी प्रत्यक्ष जीवनात आचरण करतात काय? हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे, असेही प्रा. पाटील पाटील यांनी स्पष्ट केले.

 दरम्यान यावेळी शिवजयंती उत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या वेशभूषा, वक्तृत्व स्पर्धा यांचे पारितोषिक वितरणही प्रा. पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गोविंद गोवेकर, जयवंत मावळणकर,

अभिजीत साळगावकर, सविदास नाईक, अनिल नार्वेकर, दिलीप मालदार, सागर केरकर, गोपाळ नाईक, रामा नाईक, रुपेश नाईक, शैलेश मयेकर, अच्युत घाडी, सुदेश खलप, चिरंजीव नाईक, सुनील खाडे, राघोबा करापूरकर, शिवानंद नाईक, कल्पेश नाईक, रुपेश नाईक, बाबांनी पार्सेकर, रितेश कोठावळे, विश्वसेन च्यारी, संदीप काणेकर, गीतेश मालवणकर, सुशांत साळगावकर, पुंडलिक नायक, अमिता साळगावकर, प्रियांका साळगावकर,

शाली वाघुरमेकर, रेश्मा नाईक, सोनम मयेकर, मंगल हळदणकर, वंदना नाईक, रेखा मयेकर, लक्ष्मी साळगावकर, सुजाया नायक, गेशना गोवेकर, कनिशा शिरोडकर, शम्मी नायक, श्रावणी नेमळेकर, रुद्राणी मडगावकर,  स्मिता मडगावकर तसेच सर्व परीकक्षेतील मंदिरांचे पदाधिकारी उपस्थित आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल नार्वेकर यांनी तर आभार प्रदर्शन सविदास नाईक यांनी केले.