छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा कधीच पोलीस महिलांवर दगडफेक करू शकत नाही : प्रभाकर सावंत

Edited by:
Published on: September 03, 2023 13:20 PM
views 229  views

सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा त्यांचा मराठा महिला पोलिसांवर कधीच दगडफेक करू शकत नाही, ज्या समाजात विघातक प्रवृत्या आहेत त्यांचं हे कृत्य आहे, हे घडवून आणलेलं षडयंत्र आहे मी याचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जालना येथील मराठा बांधवांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणावर दिली.

जालना अंबड येथे आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या मराठ्या बांधवांवर जालना पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात आला होता या घटनेवर विविध स्तरावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत आहे. तर विरोधी पक्षांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जालना येथील मराठा बांधवांच्या आंदोलनाच्या बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेल्या घटनेचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा हे कधीच करू शकत नाही असे सांगितले.

जालना येथील दुर्दैवी घटनेकडे मी राजकीय मी सकल मराठा समाजासोबत काम केले असल्याने मला मराठा समाजाबाबत मराठ्यांच्या प्रश्नाबाबत मला जिव्हाळा आहे. या सर्व घटना आमच्या जिव्हारी लागणाऱ्या आहेत. अशी प्रतिक्रिया प्रभाकर सावंत यांनी दिली आहे.

जालना येथील घटनेवर बोलताना पुढे प्रभाकर सावंत म्हणाले, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या लढ्याचे सरसेनापती आहेत. मराठा आरक्षण बाबत सनदशीर मार्गाने लढा देणाऱ्या मराठा समाजाच्या अनेक नेत्यांना सोबत घेत मराठा आरक्षणाचा प्रश्न एका बाजूने त्यांनी मार्गी लावला. मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न महाविकास आघाडीच्या काळात न्यायालयात गेला. त्यानंतर ज्यांनी मराठा आरक्षणाला मुहूर्त स्वरूप दिलं त्या देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्याचं षडयंत्र वाईट प्रवृत्ती कडून केलं जात असल्याची टीका ही प्रभाकर सावंत यांनी केली. 

जिल्ह्यात विरोधी पक्षांकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये अनुचित प्रकार घडविण्याचा प्रयत्न व सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतील. मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय लोक करू पाहत आहेत  त्यामुळे जिल्ह्यातील मराठा बांधवांनी जालना येथील घटनेमुळे विचलित न होता संयम पाळावा असे आवाहन करत महायुती सरकारच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला आहे.