
सावंतवाडी : महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी व विद्यार्थी यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याचा विचार आहे. यादृष्टीने राज्यामध्ये "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" आयोजन करण्यात येत आहे.
त्यानुसार सावंतवाडी तालुक्यात सावंतवाडी मंडळ दि. २९.०४.२०२५,बांदा मंडळ २४.०४.२०२५, आजगांव मंडळ दि. ३०.०४.२०२५, आंबोली मंडळ दि. २८.०४.२०२५, मडूरा मंडळ दि. २३.०४.२०२५, निरवडे मंडळ दि. २९.०४.२०२५, क्षेत्रफळ मंडळ दि. २५.०४.२०२५ व माडखोल थमंडळ येथे दि. ०२.०५.२०२५ रोजी "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. शिबीरामध्ये सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवाशी, उत्पन्न, जातीचे, तसेच इतर सर्व दाखले रेशनकार्ड वाटप, रेशन कार्डमधील नाव कमी/वाढ इत्यादी सेवा पुरविणे, तसेच संजय गांधी योजना, पीएम किसान योजना, अॅग्रिस्टॅक नोंदणी इत्यादी महसूल विभागाशी संबंधीत विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. या शिबीराच्या ठिकाणी जास्तीत जास्त लाभार्थी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.