
मालवण : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी नांदरुख साळकुंभा(गावडेवाडी) या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दुपारी 3 वाजता श्री सत्यनारायणाची पूजा, सायंकाळी 5 पासून तीर्थप्रसाद व महाप्रसाद सायंकाळी 6.30 वाजता आदर्श संगीत विद्यालय प्रस्तुत संगीत भजनाचा कार्यक्रम आणि रात्री 8 वाजता ओम श्री पावणाई कलाक्रीडा भजन मंडळ दाभोळे ता.देवगड यांचा वारकरी दिंडी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाला सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन अमित गावडे तसेच समस्त गावडे परिवार साळकुंभा घुमडे मित्र मंडळ यांनी केले आहे.