
वैभववाडी : करुळ गावठणवाडी आयोजित संपूर्ण देशभर गाजत असलेला छावा चित्रपट सोमवार दि. 17 मार्च रोजी रात्री 10 वाजता करूळ होळीचा मांड या ठिकाणी मोफत दाखविण्यात येणार आहे. शिमगोत्सवाचे औचित्य साधून होळीचा मांड या ठिकाणी पालखी मिरवणूक बरोबर विविध कार्यक्रम संपन्न होत आहे.
पहिल्या दिवशी गज्जानृत्य पार पडले. दुसऱ्या दिवशी हरकुळ बुद्रुक येथील दशावतार नाटक पार पडले. तसेच मुंबई येथील के.सी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. आज रात्री गावठणवाडीच्यावतीने छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सुवर्णसंधीचा नागरिकांनी आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन करुळ देवस्थान कमिटी व गावठणवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.