भव्य क्रिकेट स्पर्धेचं उसपमध्ये नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

माजी सरपंच दिनेश नाईक, उपसभापती बाळा नाईक व सुनील गवस यांसह ग्रा. प. सदस्यांचे आयोजन
Edited by: संदीप देसाई
Published on: March 04, 2023 22:25 PM
views 223  views

दोडामार्ग : श्री शांतादुर्गा क्रिकेटर्स परफेक्ट डेकोरेटर्स व पांडुरंग इलेव्हन बोकारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने उसप येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ओवराम क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन कसई-दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळा नाईक व उद्योजक लक्ष्मण जाधव तसेच उद्योजक सुनील गवस व प्रभाकर नाईक यांनी पुरस्कृत केलेल्या या स्पर्धेसाठी माजी सरपंच व सदस्य दिनेश नाईक, सदस्य अशोक नाईक आदी उपस्थित होते.