...तर ठेकेदाराची गय नाही : चेतन चव्हाण

Edited by: लवू परब
Published on: April 30, 2025 20:01 PM
views 173  views

दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या विकास कामांविषयी एकाही ठेकेदाराची गैय केली जाणार नाही.  कामात भ्रष्टाचार आढळल्यास खपवून घेतला जाणार असे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी मासिक सभेत स्पष्ट केले. 

    कसई दोडामार्ग नगरपंचायतची म सर्वसाधारण मासिक सभा नगरपंचायतच्या हॉल मध्ये नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांच्या सोबत मुख्याधिकारी संकेत गायकवाड, संध्या प्रसादी, क्रांती जाधव, रामचंद्र मणेरीकर व नितीन मणेरीकर, रामराव गावकर, गौरी पार्सेकर, ज्योती जाधव, सुकन्या पनवेलकर, संजना म्हावळणकर, स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर आदी उपस्थित होते. यावेळी मागील सभेचे इतिरुत्त वाचण्यात आले. तसेच नगरसेवकांनी सुचविलेल्या व लेखी स्वरूपात दिलेल्या विकास कामांचे स्वरूप वाचून ती मंजूर करण्यात आली. यावेळी वरची धाटवाडी मुख्य रस्ता ते विठू बोडेकर यांच्या घरात पर्यंत रस्ता, कसई दोडामार्ग नगरपंचायत वाचनालय इमारतीच्या सभागृहावरील शेडचे बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे करणे, वाचनालय इमारतीवर सोलर सिस्टिम कार्यान्वित करणे, मोरेश्वर मंदिर ते तनुजा ताटे यांच्या घराकडे जाणार रस्ता खडी करून डामरीकरण करणे तसेच साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत पंचशील नगर येथील समाज मंदिर इमारतीवर शेड व इतर अनुषंगिक कामे करणे, वडेश्वर मंदिर शेजारी सभागृहाचे बांधकाम करणे इत्यादी लेखी स्वरूपातील कामांना मंजुरी देण्यात आली. 

तसेच आयत्या वेळी आलेल्या विषयावर शहरातील स्ट्रीट लाईट खराब झाले आहेत. ते चेक करून नवीन बसवावे असे नगरसेवक रामराव गावकर यांनी सांगितल्यावर अध्यक्ष चव्हाण यांनी सदरचे लाईट घातले जातील तशा संबंधित ठेकेदाराल सूचना करा असे सांगितले. व एकाही ठेकेदाराची मनमानी खपवून घेतली जाणार नाही ज्यांनी स्ट्रीट लाईट बसविली व ती खराब झाली असेल तर त्या ठेकेदारला त्याची दुरुस्ती करून नवीन बसविण्यास सांगा अशा सूचना प्रशासनाला केल्यात.

  

भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही

दरम्यान आयत्या वेळी आलेल्या विषयावरून अध्यक्ष चेतन चव्हाण भडकले. नगरपंचायतच्या विकास कामात कोण मनमामी करून भ्रष्टाचार करत असेल तर अजिबात खपवून घेतला जाणार नाही मग तो कोणीही ठेकेदार असेल तरी त्याची गैय केली जाणार नाही. असे स्पष्ट  शब्दात चव्हाण यांनी सांगितले. 


MNGL चे गॅस कनेक्शन प्रत्येक घरोघरी मिळाणार

कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या प्रत्येक प्रभागात MNGL चे गॅस कनेक्शन देण्यात संदर्भात त्या कंपनीचे पत्र नगरपंचायतला आले आहे. हे कनेक्शन देते वेळी प्रभागमधील रस्त्याचे खोदकाम होणार आहे. त्यामुळे यां विषयी विशेष सभा घेऊन चर्चा करून सदर कंपनीला कळविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष यांनी सांगितले. त्यावेळी रामराव गावकर यांनी त्याचा पहिल्यांदा आराखडा मागवून घ्या त्याच्यावर चर्चा करून ठरवूया असे गावकर यांनी सांगितले.

आमदारांनी निधी देताना स्थानिकांना विश्वासात घ्यावे : रामराव गावकर

दरम्यान शहराच्या विकास कामाबाबत विषय आला असता गावकर म्हणाले की शहराच्या विकास कामांना निधी देत असताना आपल्या आमदारांनी आम्हा सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन निधी द्या. निधी देताना सार्वजनिक ठिकाणी द्यावा कोणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी देऊ नये वैयक्तिक कामांमुळे शहराचा विकास होत नाही. त्यामुळे यापुढे विश्वासत घेऊन कामे करा.