मुख्यमंत्री सहाय्यता निधीला साडे ५ लाखांचा धनादेश !

विशाल परब यांनी जपलं सामाजिक भान
Edited by: विनायक गांवस
Published on: October 15, 2025 14:42 PM
views 32  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस महाराष्ट्रातील आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ लाख ५५ हजार ५५५ रूपयांचा धनादेश देत पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारला मोठं सहाय्य केलं आहे. 

विशाल परब यांनी सामाजिक बांधीलकीतून आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला त्यांनी सुपूर्द केला आहे. तसेच पुष्पगुच्छ, केक व भेटवस्तू यावर खर्च करण्याऐवजी तो निधी सीएम फंडला देण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना केलं आहे. आपल्या हितचिंतकांना आणि कार्यकर्त्यांना तसं आवाहन त्यांनी केले आहे. याप्रसंगी भाजपचे चिटणीस महेश सारंग, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, ॲड अनिल निरवडेकर, मनोज नाईक, रविंद्र मडगावकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.