सेवा पंधरवडानिमित्त वेंगुर्लेत सेवाभावी उपक्रम

भाजप वेंगुर्ला मंडलाची 'सेवा पंधरवडा कार्यशाळा'
Edited by: दिपेश परब
Published on: September 16, 2025 12:31 PM
views 34  views

वेंगुर्ला : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस दिनांक १७ सप्टेंबर रोजी असून, त्या अनुषंगाने दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ (महात्मा गांधी जयंती) या कालावधीत भारतीय जनता पार्टी चे वतीने देशभर सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.

सेवा पंधरवड्याच्या कालावधीत विविध सेवा उपक्रमांचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वेंगुर्ला मंडलामार्फत बूथ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या सेवा उपक्रमांच्या यशस्वी नियोजनासाठी कार्यशाळा सोमवार,दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता वेंगुर्ला भारतीय जनता पार्टी कार्यालयात संपन्न झाली.

या कार्यशाळेस भाजपा राज्य परिषद सदस्य तथा जिल्हा बँक अध्यक्ष  मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, माजी मंडळ अध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रीत साईप्रसाद नाईक, राजन गिरप, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनवेल फर्नांडीस, वंदना किनळेकर, प्रितेश राऊळ, समिधा नाईक, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव वायंगणकर, अनुसूचित जाती मोर्चा बाळा जाधव, शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, मंडळ चिटणीस चेतना रजपूत, प्रणाली खानोलकर, कमलेश गावडे, नितीन चव्हाण, कोषाध्यक्ष द्यानेश्वर केळजी , प्रमोद गोळम , नारायण परब, मकरंद प्रभू, प्रदीप मुळीक, सुभाष बोवलेकर, सत्यविजय गावडे , पुंडलिक हळदणकर, राहुल मोर्डेकर , सुभाष सावंत, अभय बर्डे, अनंत केळजी, मिलिंद साळगावकर,  यशवंत परब, देवेंद्र डिचोलकर, संतोष शेटकर, मयुरेश शिरोडकर , गंगाराम परब,सुभाष सावंत , संतोष अन्सुरकर , अनिल तेंडोलकर , अजित नाईक, रवींद्र खानोलकर, अजित नाईक, ईशा मोंडकर, हसीनबेगम  मकानदार, रसिका मठकर, रुपाली नाईक, श्रद्धा धुरी , मनोहर खानोलकर , प्रदीप गवंडे, वासुदेव राऊळ, सत्यवान पालव सर्व  शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

कार्यशाळेचे सूत्रसंचलन तालुका सरचिटणीस वसंत तांडेल यांनी केले व आभार मंडळ अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब यांनी मानले.