
सावंतवाडी : चराठा ग्रामपंचायतीत गाव विकास पॅनलनं आपला सरपंच व सदस्य विजयी करत भाजप व महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला होता. सरपंच पदाच्या उमेदवार प्रचिती कुबल यांच्यासह गाव विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले होते. याठिकाणी भाजप व राष्ट्रवादीचेही सदस्य निवडून आले आहेत. रविवारी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील विजयी सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला नवनिर्वाचित सरपंच प्रचिती कुबल, माजी सरपंच रघुनाथ उर्फ बाळू वाळके यांनी उपस्थित राहत मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला. दरम्यान, आपण गाव विकास पॅनल म्हणूनच कार्यरत राहणार, असं मत बाळू वाळके यांनी व्यक्त केले.