
सावंतवाडी : भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी भाजपच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह कबुलायतदार प्रश्न सुटेल, तो प्रश्न सोडविण महत्वाचे आहे. त्यामुळे क्रेडीट कोणाला जाणार, हे न पाहता प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न झाला पाहीजे, असं विधान भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामांसाठी 3 हजार कोटी निधी भाजप-सेना सरकारने दिलाय. त्यामुळे जिल्ह्यातील सुरू असलेली काम दर्जेदार झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं मत व्यक्त केले. तर सावंतवाडी विधानसभेची जबाबदारी माझ्यावर असल्यानं या ठिकाणी काम पाहिन. कणकवलीत नितेश राणे, कुडाळमध्ये निलेश राणे यांच्यावर जबाबदारी आहे. अध्यक्ष म्हणून ३ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यान नव्या चेहऱ्यांना संधी दिली जावी, असं विधान त्यांनी व्यक्त केल.
यावेळी सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना जिल्ह्याची सक्षम नसणारी आरोग्य यंत्रणा, ड्रायव्हरवीना धुळ खात पडलेल्या अॅमब्युलनसह भिजत घोंगडे असलेल्या मल्टिस्पेशालीटीवरून पत्रकारांकडून घेरण्यात आलं. यावेळी येथील आमदार बदला सगळे प्रश्न सुटतील, अस मत त्यांनी व्यक्त केल.
भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सांरग, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी आदी उपस्थित होते.
एकंदरीत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर व स्थानिक भाजपातील संघर्ष मिटण्याऐवजी तो आणखीच वाढताना दिसत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे.