विश्वकर्मा बैलगाडी स्पर्धेचे मानकरी ठरले चंद्रकांत सावंत

उत्कृष्ट नियोजनाबद्दल सुशांत नाईक यांनी केले विश्वकर्मा मित्रमंडळाचे कौतुक
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 12, 2023 20:31 PM
views 166  views

कणकवली :विश्वकर्मा मित्र मंडळ सुतारवाडी कणकवली यांच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेमध्ये आयोजन कणकवली येथे 12 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या बैलगाडा स्पर्धकांनी शासकीय नियमांचे पालन करत आपल्या बैलगाड्या पळवल्या त्यामध्ये कणकवली वरचीवाडी येथील चंद्रकांत सावंत यांच्या बैलगाडीने 48.19 सेकंदात आठशे मीटर अंतर पार करत पहिला नंबर पटकावला यावेळी नगरसेवक सुशांत नाईक यांच्या हस्ते त्यांना रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित करण्यात आले

तर दुसरा नंबर राजू बागवे कुडाळ कुंदे यांनी  तर तिसरा चंद्रकांत  नारायण वाटवे यांनी पटकावला तसेच उत्कृष्ट गाडी चालक संतोष ठाकूर हळवल तर उत्कृष्ट बैल जोडी चंद्रकांत वाटवे कुडाळ यांना देण्यात आले या स्पर्धेसाठी प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार शिवाजी राठोड, पोलीस उपनिरीक्षक सागर खंडागळे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी चौगुले व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.

या बैल गाडीच्या स्पर्धेचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बैलगाडीवर बसून मैदानात फिरवत करण्यात आले यावेळी सतीश सावंत संदेश पारकर सुशांत नाईक,कन्हैया पारकर ,प्रदीप मसुरकर तेजस राणे, सदानंद राणे ,आंबाजी राणे व मंगेश राणे, जयू धुमाळे , प्रथमेश मेस्त्री, नीलकंठ मेस्त्री, अनंत मेस्त्री, विश्वनाथ मेस्त्री, कल्पेश मेस्त्री, प्रशांत साटम, अनिकेत देसाई प्रकाश मेस्त्री, संजय पांचाळ, दत्तू मेस्त्री, बबन पांचाळ,सुभाष मेस्त्री, चंद्रकांत मेस्त्री

 मंडळाचे अध्यक्ष नितीन पांचाळ महेश मेस्त्री अक्षय मेस्त्री व प्रतिक मेस्त्री उपस्थित होते ही स्पर्धा पाहण्यासाठी हजारांच्या संख्येने लोकही जमले होते त्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या आणि खूप उत्कृष्ट नियोजनात पार पडली त्याबद्दल मंडळाच्या अध्यक्षांनी यांचे आभार मानले तसेच या स्पर्धेसाठी  उत्कृष्ट सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले