जिल्ह्यात पुढील तीन दिवस गडगडाटासह पाऊस - वादळाची शक्यता

Edited by:
Published on: May 14, 2024 13:50 PM
views 171  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुरुवात झाली आहे मात्र आगामी तीन दिवसात प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचे कडून प्राप्त झालेल्या सूचनानुसार जिल्ह्यात गडगड आटा सह पाऊस पडणार असून या कालावधीत विजा चमकण्याची शक्यता आहे.तसेच 40 ते 50 किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत.त्यामुळे जिल्हा वासियांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा आप्पत्ती व्यवस्थापन विभागाने केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला यावर्षी प्रथमच कडाक्याच्या उन्हाळ्याचा त्रास सहन करावा लागला. सुमारे 40 ते 42 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद जिल्ह्यामध्ये अधून मधून होत होती. त्यामुळे जिल्हा वाशिय हतबल झाले होते. या उष्णतेतच गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरू झाल्याने वातावरणात थोडासा थंडावा निर्माण झाला आहे. तरीही दिवसाची वेळ प्रचंड उकाड्याची जात आहे. यात प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी पुढील तीन दिवस जिल्ह्यात पाऊस होईल असा इशारा दिल्याने या प्रचंड तापलेल्या वातावरणात जिल्हा वासियांना थोडा थंडावा मिळणार आहे.

प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त पूर्व सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 15 मे 2024 ते दिनांक 17 मे 2024 या कालावधीत गडगडाटासह पाऊस पडणार असून या कालावधीत विजा चमकण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आलेली आहे.तसेच दिनांक 14, 16 व 17 मे 2024 रोजी जिल्ह्यात 40 ते 50 किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत, तरी सदर अनुषंगाने आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या सौ.राजश्री सामंत यांनी केले आहे.