
सावंतवाडी: उपजिल्हा रुग्णालयामध्ये नुकत्याच सुरू झालेल्या सिटीस्कॅन विभागात पेशंटची वाढत चाललेली गर्दी पाहता पेशंटला बसण्यासाठी टेबल व खुर्च्या अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे वृद्ध व इतर पेशंटांना त्या ठिकाणी तासंतास उभ राहावं लागत होते. हे पाहून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दानशूरांनी हॉस्पिटलसाठी खुर्च्या द्याव्यात असे आवाहन करण्यात आले होते. या आव्हानाला अपर्णा प्रशांत कोठावळे यांनी प्रतिसाद दिला. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हॉस्पिटलला स्वखर्चाने 12 खुर्च्या भेट स्वरूपात दिल्या.
या कार्यक्रमा दरम्यान एका गरीब महिला पेशंटला डॉक्टरांनी 1600 चे इंजेक्शन लिहून दिलं असता त्या पेशंट जवळ तेवढे पैसे नव्हते. ही बाब सौ. कोठावळे यांच्या लक्षात येताच त्यांनी महिला पेशंटलेला इंजेक्शन खरेदी करून देत सहकार्य केले. यासाठी त्या पेशंटने त्यांचे आभार मानले. दरम्यान, सामाजिक बांधिलकीच्या आव्हानाला व प्रामाणिक सेवाभावी कार्याला दानशूरांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असून दानशूरांचे आभार सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतिश बागवे यांनी मानले आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा कोठावळे, जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, डॉ.गिरीश चौगुले, डॉ.प्रवीण देसाई, डॉ. आकाश मंगलगी, डॉ. ईश्वर पटणे तसेच सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते सचिव समीरा खलील, रवी जाधव,रूपा मुद्राळे व शैलेश गावडे आली उपस्थित होते.