छ. शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त डॉ. रुपेश पाटकर करणार मार्गदर्शन

समता प्रेरणाभूमी संवर्धन समिती यांचं आयोजन
Edited by: विनायक गावस
Published on: June 24, 2023 11:59 AM
views 146  views

सावंतवाडी : समता प्रेरणाभूमी संवर्धन समिती सावंतवाडी आयोजित लोकराजा राजर्षि छ. शाहू महाराज जन्मदिन - सामाजिक न्यायदिनानिमित्त गुरुवार दि. २९ जून २०२३ स. १० वाजता समाजमंदिर सावंतवाडी येथे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आल आहे. छ. शाहू महाराज यांची सामाजिक न्यायाची भूमिका आणि स्वतंत्र भारतातील सामाजिक न्यायाचा प्रवास यावर व्याख्याते डॉ. रूपेश पाटकर मार्गदर्शन करणार आहेत.

दिपक पडेलकर हे कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी असणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्याध्यक्ष अंकुश कदम, उपाध्यक्ष भावना कदम, सेक्रेटरी मोहन जाधव, खजिनदार एम. बी. जाधव यांनी केले आहे.