
देवगड : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतर्गत तृणधान्य पाककृती स्पर्धेचे आयोजन देवगड येथील गट साधन केंद्र(BRC)येथे तालुका स्तरावर करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये केंद्र शाळा कोटकामते नंबर १ ने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले प्रथम क्रमांक विजेत्या शाळेला प्रशस्तीपत्र आणि रोख पाच हजार रुपये बक्षीस गटविकास अधिकारी जयप्रकाश परब आणि गटशिक्षणाधिकारी काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.बक्षिसाची रक्कम पालक गौरी दळवी, सचिन दळवी आणि शाळेच्या शिक्षिका श्रीम.दराडे मॅडम यांनी स्वीकारली.
ही स्पर्धा देवगड तालुक्यातील सर्व शाळा, बावीस केंद्रात ,आणि तालुका स्तरावर घेण्यात आली होती.तीनही स्तरावर प्रथम क्रमांक कोटकामते नंबर 1 शाळेने पटकावला आहे.