CEO रविंद्र खेबूडकर यांचा गुणवंतांशी संवाद

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 28, 2025 12:50 PM
views 84  views

सिंधुदुर्गनगरी : भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम सिंधू प्रज्ञाशोध परीक्षेत तालुक्यातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची दिनांक १८ते२२मार्च दरम्यान इस्रो सेंटरला थुंबा(तिरुवनंतपुरम) याठिकाणी अभ्यास सहल आयोजित केली होती. यशस्वीरित्या अभ्यास  सहल पूर्ण करून आलेल्या निवडक दहा मुलांशी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी आपल्या दालनात मनमोकळेपणाने संवाद साधला आणि सहलीची यशस्वीता पडताळली. मुलांनीही साहेबांच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण प्रतिसाद दिला. 'मंगलयानसारखे सिनेमा बघा त्यामुळे वैज्ञानिक प्रोजेक्टवर कसे काम करतात ते पहायला मिळेल'असे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर यांनी सांगितले.

 प्राथ.शिक्षणाधिकारी डॉ.गणपती कमळकर यांनीही मुलांशी संवाद साधताना सांगितले की एपीजे अब्दुल कलामांसारखी दिवसा स्वप्ने पहा आणि त्यादिशेने वाटचाल करा. उपशिक्षणाधिकारी आंगणे साहेब यांनी पालकांशी संवाद साधताना सांगितले की आपल्या पाल्याला स्वप्न नेहमी मोठी दाखवा पण त्याचबरोबर वास्तव परिस्थितीची जाण मुलांना करून द्यायला विसरू नका. त्यांनी मुलांना आताच करीयरची दिशा ठरवून त्यादिशेने वाटचाल सुरू करायचे आवाहन केले.

यावेळी अभ्यास सहलीत सहभागी शिक्षक सौ.तेजल ताम्हणकर, सौ.वैशाली पाटील,सौ जान्हवी खानोलकर,श्री. जयसिंग खानोलकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पालकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यशश्री ताम्हणकर- मसुरे देऊळवाडा मयंक नंदगडकर -वेंगुर्ला नं.१, प्राजक्ता भोकरे- वेंगुर्ला नं.2, जानवी पाटील -कुंभवडे वरद बाकरे- कणकवली नं.३, सम्यक पुरळकर- कणकवली नं.३, चिन्मयी खानोलकर- दोडामार्ग नं.१, आर्यन कुलकर्णी- वारगाव नं.१  दिपाली भणगे- घोडगेवाडी इशिका चव्हाण कसाल नं.१ आदी शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते.