सेंट्रल इंग्लिश स्कूलचा वसंत गवस शिष्यवृत्तीसाठी पात्र

Edited by: रवींद्र जाधव
Published on: July 15, 2025 15:46 PM
views 86  views

 सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत   सेंट्रल इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी  वसंत  संदीप गवस (२१० गुण) शहरी विभागात ७०.९४ टक्के मिळवून  जिल्ह्यात १६ व्या क्रमांकावर येत शिष्यवृतीसाठी पात्र ठरला  आहे.  

वसंत गवस यास श्रीम. स्मृती गवस, श्रीम. मारिया पिंटो, श्रीम. फिरदोस खॉजा, तेहसीन मिर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेचे  पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक - शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी   यांनी   वसंत गवस याचे व त्याच्या पालकांचे   अभिनंदन केले व  भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.