
सावंतवाडी : मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत इ . ५ वी तील ९ विद्यार्थी व इ. ८ वी तील ९ विद्यार्थी असे एकुण १८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.
या परीक्षेत इ.५ वी तील रेहम अल्ताफ बेग, श्रेयस सुरेश परब, अदीबा सलिम कडोली, विहान तुषार परुळेकर, आलिया फहिम मुजावर, नहुष नंदकिशोर पारगावकर, अनस अझ्मतुल्लाखान शेंडेवाले, दिलशान आलमगिर शेख, झुहा जहीर अब्बास शेख, ८ वीतील दानिन नासिर अन्सारी, भोमाराम मंगेश देवासी, अंकुश सोहनलाल माल्विया, मोहम्मद मुस्तफा वसिम पटेल , वैष्णवी संजय पालकर, आसिफ हसन शेख, झुबी इरफान शेख, माझ अझ्मतुल्लाखान शेंडेवाले असद मुजफ्फर तुरेकर विद्यार्थी पुढील गणित प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
या विद्यार्थांना प्रशालेतील शिक्षिका फिरदोस ख्वाजा यांनी मार्गदर्शन केले. सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक -शिक्षक कार्यकारिणी समिती पदाधिकारी यांनी यशस्वी विद्याथ्यांचे अभिनंदन केले व पुढील गणित प्राविण्य परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.










