
सावंतवाडी : सेंट्रल इंग्लिश स्कूल, सावंतवाडीचा १०० टक्के निकाल लागला. यात आमना गवंडी ९४.६० टक्के प्रथम, सैद बेग ९१ टक्के द्वितीय तर प्रविण सैनी ९०.४० तृतीय क्रमांक प्राप्त केला. रय्यान पटेल ८९.८० व आर्या आळवे ८९.२० अनुक्रमे चतुर्थ व पंचम क्रमांक प्राप्त केला. चेअरमन इम्तियाज खानापुरी व मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ यांनी गुणवंतांचे अभिनंदन करत शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.