कट्टा पूर्ण प्राथमिक जीवन शिक्षण शाळेचा शताब्दी सोहळा उत्साहात...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 13, 2024 12:58 PM
views 107  views

देवगड : देवगड तालुक्यातील कट्टा गावातील “पूर्ण प्राथमिक जीवन शिक्षण” शाळेचा शताब्दी सोहळा रविवार दि.७ व सोमवार दि.८ एप्रिल २०२४ या दोन दिवशी” कट्टा विकास संघ “, “कट्टा शाळा शताब्दी सोहळा समिती यांच्या आयोजनातून कट्टा ग्रामस्थ, आजी – माजी शिक्षक तसेच आजी – माजी विद्यार्थी यांच्या समवेत संपन्न झाला.

रविवार दि.७ एप्रिल २०२४ ला ८वाजता शाळेचे आजी -माजी विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी “श्रीदेव विठ्ठल रखुमाई मंदिर “तसेच “श्रीदेव वाडवळ मंदिर ” या देवांची मनोभावे पूजा करून ढोल- ताश्या -झेंडे यांच्या गजरात पुऱ्या गावातून मिरवणूक काढून शताब्दी सोहळ्याची आनंदमय वातावरण निर्मिती केली, तेथून मिरवणूक मार्गस्थ होऊन वरच्या वाडीच्या रस्त्याने कट्टा शाळेच्या स्व.शंकर राघो ढोके प्रवेशद्वारावर आल्यावर सर्व उपस्थित आजी – माजी शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्याकडून सर्वांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर सर्वांनी दोन्हीं शाळेच्या समोर पुन्हा एकदा ढोल – ताश्याच्या गजरात फेर धरून विठुरायाच्या भक्तिमय गीतावर नृत्यविष्कार करून शाळेप्रती आनंदाची उधळण केली. जुन्या शाळेच्या स्टेजवर सरस्वती देवीची स्थापना करून शाळेचे माजी शिक्षक डाॅ.अंकुश सारंग, कट्टा शाळा शताब्दी सोहळा समितीचे अध्यक्ष डाॅ. गणेश उर्फ भाई बांदकर व शाळा स्थापना मान्यवर कै. शंकर राघो ढोके यांचे सुपुत्र. निवृत्ती ढोके यांच्या शुभहस्ते तसेच ग्रामस्थांच्या समवेत पूजन करण्यात आले.

सरस्वती पुजनानंतर श्रीसत्यनारायणाची महापूजा श्री. श्याम शेडगे सपत्नीक यांच्या हस्ते उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या समवेत मंगलमय आरतीने संपन्न होऊन सर्वांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. समितीने ठरविलेल्या नियोजनाप्रमाणे शताब्दी सोहळ्याच्या पुढील कार्यक्रमाला सुरवात झाली. कार्यक्रसाठी उभारलेल्या रंगकर्मी स्व.काशीनाथ गावकर रंगमंचावर माजी शिक्षक डाॅ.अंकुश सारंग, श्रीमती लता चौगुले, भाजपाचे माजी आमदार श्री. अजित गोगटे, देवगड पोलीस निरीक्षक श्री.अरुण देवकर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. उषाताई केळुस्कर या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सर्व श्रोत्यांच्या समवेत शाळेच्या एवढ्या वर्षाच्या आठवणींचे मनोगताद्वारे प्रगटिकरण करण्यात आले. त्यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देवून रंगामच्यावरील माजी शिक्षकांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर माजी शिक्षकांचा शाल व श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून समितीचे अध्यक्ष डाॅ. भाई बांदकर, श्री.गणेश सागवेकर, डाॅ. कृष्णा बांदकर, माजी सभापती विश्वनाथ वायंगणकर यांनी सत्कार केले. मोठया संख्येने आजी – माजी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. या सत्राचे निवेदन श्री. दाजी उर्फ भगवान कोयंडे यांनी केले. स्नेहभोजनानंतर दुपारच्या सत्राला सुरुवात झाली यावेळी उपस्थित महिलांसाठी “हळदीकुंक समारंभाचे” आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नेहा रजपूत यांच्यावतीने करण्यात आले होते. हळदीकुंकू बरोबर प्रेमाची भेट म्हणून हँडवॉश व गुलाब पुष्प देण्यात आले. हळदी कुंकू समारंभा नंतर कणकवली देवगड विभागाचे भाजपचे आमदार नितेश राणे यांचे आगमन झाले त्यांना समितीचे अध्यक्ष डाॅ.भाई बांदकर यांच्या हस्ते शाळेचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे शाळेच्या शताब्दी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. त्यावेळेस कार्यक्रमाचे निवेदन . प्रदीप हिरनाईक यांनी केले. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी श्रोत्यांसमोर “बाल शिवाजी पाळणा” व “माऊली माऊली “या दोन गाण्यावर नृत्य सादर केले. या दोन्ही नृत्याला सर्व श्रोत्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देवून मुलांचे कौतुक केले या दोन्हीं गाण्यांचे नृत्यदिग्दर्शकन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नेहा रजपूत व ग्रामस्थ कलाकार . संतोष जुवाटकर यांनी केले.

संध्याकाळच्या सत्राला सुरुवात करताना निवेदन. भगवान कोयंडे यांनी उर्वरित माजी विद्यार्थ्यांचा सत्कार घेतला त्यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले त्यानंतर प्रदीप हिरनाईक यांनी शाळेच्या मनोगताबाबत लिहिलेल्या मी शाळा बोलते बाबांनो या कविता साजरी करून तसेच डाॅ. भाई बांदकर यांनी लिहिलेल्या शाळेच्या मनोगताचे सादरीकरण झाले त्याचप्रमाणे गणेश सागवेकर व राजेंद्र ढोके यांनी मनोगत व्यक्त केले. या काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन कविवर्य प्रदीप हिरनाईक यांनी केले.

स्नेह भोजनानंतर नागेश कडू निर्मित व डाॅ.भाई बांदकर लिखित-दिग्दर्शित “शाळा सुटली तरी पाटी नाही फुटली” हा धम्माल हिंदी ऑक्रेस्ट्रा सुरु झाला त्याची सुरुवात शाळा सुटली तरी पाटी नाही फुटली या गाण्याने झाली त्यात सौ.कविता कडू या ग्रामस्थ कलाकाराने रंगामंच्यावर त्या गीतावर नृत्य सादर केले. हा ऑर्केस्ट्रा जवळजवळ रात्री १२ वाजेपर्यंत चालला त्यात प्रोफेशनल गायकांबरोबर माजी विद्यार्थी. दयानंद शेडगे यांनी आपले एक गीत तसेच. संतोष जुवाटकर यांनी वासुदेव आला हो वासुदेव आला या गाण्यावर नृत्य सादर केले. या बहारदार कार्यक्रमाला सर्व आजी माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. ऑर्केस्ट्रा मध्ये विविध गाणी तसेच लावणी ही सादर झाली त्या लावणी वर कु. किर्ती पुजारे या दहावीच्या विद्यार्थिनीने उत्कृष्ट लावणी नृत्य करून प्रेक्षकांची दाद मिळविली अश्या विविधअंगानी शताब्दी सोहळ्याचा पहिला दिवस उत्साहाने साजरा झाला. ऑर्केस्ट्राच्या अगोदर अध्यक्ष गणेश बांदकर यांनी .श्याम शेडगे अनिल शेडगे . भगवान कोयंडे राजन ढोके व विजय राणे या ग्रामस्थ प्रतिनिधी समवेत शाळेच्या पुढील भविष्याबाबत एक प्रस्ताव मांडला त्यावर साधक बाधक चर्चा झाली ही चर्चा सुरू असताना ग्रामस्थ सुरेश कोयंडे यांनीही त्यात सहभाग घेऊन या प्रस्तावावर दि.१०/४/२०२४ ला ठीक ११वाजता ग्रामस्था समवेत चर्चा घडवून आणण्याबाबत सुतोवाच केले.

दुसऱ्या दिवसाला शाळेत त्यावेळी कार्यरत असलेल्या शिक्षकांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले त्यात पाच महिलाजेष्ठ शिक्षिका व पाच जेष्ठ शिक्षकांनी सहभाग घेतला समितीचे अध्यक्ष डाॅ.भाई बांदकर यांनी सर्वांना बोलते करून गतकाळातील आठवणीना उजाळा दिला. सर्वांनी कळकळीने आपले मनोगत मांडले त्याचबरोबर भविष्यासाठी शाळा टिकविन्यासाठी काय करावे लागेल याबाबत मार्गदर्शन केले त्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

दुपारी ठिक ४ वाजता शाळेच्या आजी विद्यार्थांनी विविध गाण्यावर नृत्य सादर केले त्यानंतर पुन्हा एकदा शाळेच्या भविष्याबाबत . नथुराम ढोके . राजन ढोके . भगवान कोयंडे . कृष्णा बांदकर यांच्यसमवेत समिती अध्यक्ष डाॅ.भाई बांदकर यांनी विचारविनिमय केला.

या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये . सुनील करंगुटकर दयानंद शेडगे . जगन्नाथ दरवेस . श्याम शेडगे . गणेश सागवेकर . विठू प्रभु . प्रकाश कोयंडे डाॅ.कृष्णा बांदकर . निवृत्ती ढोके यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षाना मोलाचे सहकार्य केले. दोन दिवसांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व माजी विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थांना स्नेहभोजन व चहा नास्ता यासाठी पंढरीनाथ आचरेकर, वाडा यांनी खूपच मेहनत घेतली. शाळेच्या आवारामध्ये मंडप व्यवस्था लाईट डेकोरेशन तसेच साऊंड सिस्टिम चे सर्व नियोजन बाबा सारंग पिरवाडी यांनी केले. शाळेच्या भविष्याच्या योजना कोणत्या असाव्या जेणेकरून शाळेला उर्जीता अवस्था येईल यावरही पुन्हा एकदा विचार मंथन झाले त्यानंतर स्नेहभोजनाचा सर्व उपस्थित मंडळींनी आस्वाद घेतला. त्यानंतर देवगड धमाल मराठी ऑर्केस्ट्रा देवगड यांच्यावतीने सिंथेसायजर प्रसाद झाकी तबला रमेश गोंधळी यांची संगीत साथ व गायक संदीप फडके सौ.प्रियांका वेलणकर व डाॅ. निशा धुरी यांनी आपल्या सुमधुर गीतांनी सर्व श्रोत्यांना त्यांना मंत्रमुग्ध केले अशा रीतीने दुसऱ्या दिवसाची सांगता झाली.

सुनिल करंगुटकर, अनिल शेडगे, प्रकाश कोयंडे, विलास शिरवडकर, जगन्नाथ कोयंडे, संतोष करंगुटकर, विठू प्रभू, शाम करंगुटकर, डाॅ. कृष्णा बांदकर, गणेश सागवेकर, सुधाकर सागवेकर, मनोहर कोयंडे यांच्या अथक परिश्रमातून हा सोहळा संपन्न झाला.